नाताळ सणाला ‘जीएसटी’चा फटका जय्यत तयारी : ग्राहकांमध्ये नाराजी, तरीही उत्साह कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:24 IST2017-12-13T01:23:41+5:302017-12-13T01:24:30+5:30
ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा असलेला नाताळ तथा ख्रिसमस सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे.

नाताळ सणाला ‘जीएसटी’चा फटका जय्यत तयारी : ग्राहकांमध्ये नाराजी, तरीही उत्साह कायम
नाशिक : ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा असलेला नाताळ तथा ख्रिसमस सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे. परंतु नाताळ सणासाठी लागणाºया सजावटीच्या वस्तूंवर १८ टक्के कर लागू करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर असला तरी सणाचा उत्साह कायम आहे.
नाताळ सण जवळ आल्याने ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बाजारात नाताळसाठी लागणाºया वस्तू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून, सजावटीच्या वस्तूंची रेलचेल दिसून येत आहे. तसेच नवनवीन सजावटीच्या वस्तू बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये नवनवीन मेणबत्त्या, सजावटीच्या वस्तू, नवीन कपडे, नवनवीन स्टार, बेल्स, लॅस्टिकचे बॉल्स बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. नाताळ सणाची तयारी म्हणून लोकांनी घरांना रंगरंगोटी करणे, नवीन कपडे घेणे आदी तयारी सुरू आहे. तसेच या सणानिमित्त गव्हाणी उभारणे, म्हणजेच ख्रिस्त जन्माच्या देखाव्याची तयारी घराघरांत दिसून येत आहे. यासाठी आवश्यक असणाºया वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कॅरेल्स म्हणजे येथू ख्रिस्ताची गाणी त्याची प्रार्थना आदी जय्यत तयारी सुरू आहे.