गट-गणांची ५ आॅक्टोबरला सोडत
By Admin | Updated: September 27, 2016 01:53 IST2016-09-27T01:53:15+5:302016-09-27T01:53:43+5:30
गटांची जिल्हाधिकारी कार्यालय, तर गणांची तहसील कार्यालयात

गट-गणांची ५ आॅक्टोबरला सोडत
नाशिक : बहुप्रतीक्षित जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या जागांची आरक्षणाची सोडत पद्धत व चक्रानुक्रम येत्या ५ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता प्रत्येक तहसील व प्रांत कार्यालयात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण हे दि. ५ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोडत काढण्यात येईल.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १२ उपकलम (१), कलम ५८ (१) (अ) प्रमाणे व जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम निवडणूक विभाग व निर्वाचन गण प्रसिद्ध करण्यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत (लॉटरी) पद्धतीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडत दि. ५ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता नियोजन भवनात होईल. नियोजन भवनातच दुपारी १२ वाजता गणांची सोडत काढण्यात येईल. प्रत्येक तालुकानिहाय पंचायत समिती गणांची सोडत पुढील ठिकाणी होईल. सर्व गणांची सोडत सकाळी ११ वाजता काढण्यात येईल. पंचायत समिती, बागलाण - पंचायत समिती बागलाण सभागृह, पंचायत समिती, मालेगाव - प्रांत कार्यालय मालेगाव, पंचायत समिती, नांदगाव - तहसील कार्यालय सभागृह, नांदगाव, पंचायत समिती येवला - तहसील कार्यालय सभागृह, येवला, पंचायत समिती चांदवड - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह, चांदवड, पंचायत समिती देवळा - पंचायत समिती सभागृह, देवळा, पंचायत समिती, कळवण - पंचायत समिती सभागृह, कळवण, पंचायत समिती, सुरगाणा - तहसील कार्यालय सभागृह, सुरगाणा, पंचायत समिती, दिंडोरी - तहसील कार्यालय सभागृह, दिंडोरी, पंचायत समिती, निफाड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन सभागृह, निफाड, पंचायत समिती, इगतपुरी - पंचायत समिती सभागृह, इगतपुरी, पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर - तहसील सभागृह, त्र्यंबकेश्वर, पंचायत समिती, सिन्नर - तहसील कार्यालय सभागृह, सिन्नर, पंचायत समिती पेठ - पंचायत समिती सभागृह, पेठ यानुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
उत्सुकता शिगेला
जिल्हा परिषद गट व गणांची प्रचंड उत्सुकता इच्छुकांना लागली आहे. इच्छुकांनी तर आतापासूनच अमुक तालुक्यातील अमुक गट आरक्षित झाले. अमुक तालुका संपूर्ण आरक्षित राहील. तमुक तालुक्यातील सर्व गट खुले राहतील, अशा अटकळी बांधल्या आहेत. तालुकास्तरावरून व जिल्हास्तरावरून आरक्षणाबाबतचे प्रस्ताव यापूर्वीच विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गेले आहेत.