नऊ जोडप्यांचा सामूहिक‘निकाह’

By Admin | Updated: March 21, 2016 00:02 IST2016-03-20T23:48:40+5:302016-03-21T00:02:31+5:30

‘उडान’चा उपक्रम : १६ वर्षांत १४४ जोडपे विवाहबद्ध

Group 'nine' of nine couples | नऊ जोडप्यांचा सामूहिक‘निकाह’

नऊ जोडप्यांचा सामूहिक‘निकाह’

नाशिक : मुस्लीम समाजात सामूहिक विवाहाची संकल्पना रुजविणाऱ्या उडान एज्युकेशन अ‍ॅन्ड वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या वतीने आयोजित सोळाव्या सामूहिक विवाह (इज्तेमाई शादियॉँ) सोहळ्यात नऊ जोडप्यांचा ‘निकाह’ पारंपरिक पद्धतीने पार पडला.
वडाळारोडवरील मिरजकर मैदानात आयोजित विवाह समारंभाप्रसंगी समाजातील विविध मान्यवर वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने झालेल्या या सोहळ्यामध्ये मौलाना वासिक रजा, मौलाना जाहीद रजवी यांनी विधीवत निकाह पार पाडला. खतीब-ए-शहर हिसामुद्दीन अशरफी यांनी दुआ करत वधू-वरांचे भावी वैवाहिक आयुष्य सुख समाधानाचे जावो, ही सदिच्छा व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, जयप्रकाश छाजेड, हाजी रऊफ पटेल, नगरसेवक सुफी जीन आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार फरांदे यांनी संस्थेचा उपक्रम प्रेरणादायी असून, समाजाच्या विकासासाठी पूरक ठरणारा असल्याचे मत व्यक्त केले. समाजातील गरजू घटकांमधील मुलामुलींचा विवाह जमवून तो थाटामाटात समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व ज्येष्ठ धर्मगुरूंच्या उपस्थितीत पार पाडणे हे आगळे कौशल्य असल्याचे फरांदे यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील नववधू-वरांना संस्थेच्या वतीने एकसमान संसारपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व जोडप्यांच्या आलेल्या पाहुण्यांसाठी संस्थेने भोजनाचीही उत्तम व्यवस्था केली होती. तसेच प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष फजल शेख यांनी केले. या विवाहसोहळ्याप्रसंगी समाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक, वकील, डॉक्टर, उद्योजक मोठ्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Group 'nine' of nine couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.