मृद, जलसंधारण विभागामुळे २२ अभियंत्यांच्या सेवेवर गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:18 IST2017-08-10T23:11:21+5:302017-08-11T00:18:06+5:30
राज्यात नव्यानेच निर्माण झालेल्या मृद व जलसंधारण विभागामुळे शून्य ते शंभर हेक्टरच्या आत जलसंधारणाची कामे करणाºया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील अनेक उपविभाग बंद होणार आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचा विचार केला तर १४ पैकी ७ विभाग बंद होणार असल्याने या उपविभागात कार्यरत २२ शाखा, कनिष्ठ अभियंत्यांच्या सेवांवर गंडांतर येण्याची भीती निर्माण झाली आहे.

मृद, जलसंधारण विभागामुळे २२ अभियंत्यांच्या सेवेवर गंडांतर
नाशिक : राज्यात नव्यानेच निर्माण झालेल्या मृद व जलसंधारण विभागामुळे शून्य ते शंभर हेक्टरच्या आत जलसंधारणाची कामे करणाºया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील अनेक उपविभाग बंद होणार आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचा विचार केला तर १४ पैकी ७ विभाग बंद होणार असल्याने या उपविभागात कार्यरत २२ शाखा, कनिष्ठ अभियंत्यांच्या सेवांवर गंडांतर येण्याची भीती निर्माण झाली आहे.
३१ मे २०१७ च्या मृद व जलसंधारण विभागाच्या निर्णयान्वये लघुपाटबंधारे विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या तांत्रिक सेवा औरंगाबाद येथील मृद व जलसंधारण आयुक्तालयाकडे वर्ग होणार आहेत, तर प्रशासकीय सेवा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत राहणार आहे. ३१ मे २०१७ च्या निर्णयान्वये दोन तालुके मिळून उपविभागाची निर्मिती करण्यात येणार आहे. जिल्ह्णाचा विचार केला तर पूर्व व पश्चिम या दोन विभागांकडे देवळा तालुका वगळता सर्व तालुक्यांसाठी प्रत्येक एक असे १४ उपविभाग कार्यरत आहेत. नवीन निर्णयामुळे केवळ दोन तालुके मिळून सात किंवा आठच उपविभाग कार्यरत राहणार आहे. त्यामुळे उर्वरित सात उपविभाग बंद होणार असून, या उपविभागात कार्यरत जवळपास २२ शाखा, कनिष्ठ शाखा अभियंत्यांच्या सेवेवर गंडांतर येणार आहे. या २२ शाखा, कनिष्ठ अभियंत्यांच्या सेवा आता बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील रिक्त असलेल्या शाखा, कनिष्ठ अभियंत्यांच्या जागी वर्ग होणार आहे.