सकल मराठा समाज, सिडको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:13+5:302021-06-09T04:17:13+5:30
अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून ...

सकल मराठा समाज, सिडको
अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा आदेश तसेच कोरोनाचे नियम पाळत साजरा केला. या शिवराज्याभिषेकदिनी सिडको विभाग सकल मराठा समाजाच्या वतीने पाथर्डी फाटा या ठिकाणी पश्चिमचे आमदार सीमा हिरे तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला. कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या सर्व बांधवांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गीते, आशिष हिरे, विजय पाटील, संजय भामरे, मकरंद सोमवंशी, पंकज पाटील, उमेश चव्हाण, डॉ. वैभव महाले, मुकेश शेवाळे, अमोल पाटील, गणेश अरींगळे, प्रीतम भामरे, हर्षल चव्हाण, प्रा. अमोल पाटील, कमलेश कमानकर, अजय पाटील, सुनील आहिरे, राकेश ढेमसे, जय पवार, नितीन अमृतकर, सुमीत जाधव, मयूर शिंदे, कुंदन हिरे आदी उपस्थित होते. योगेश गांगुर्डे यांनी आभार मानले.
===Photopath===
070621\07nsk_39_07062021_13.jpg
===Caption===
फोटो ओळीं:सकल मराठा समाज सिडको विभागाच्या वतीने पथर्डीफटा येथे शिवराज्याभिषेक दिनाप्रसंगीआमदार सिमा हिरे, नानासाहेब महाले समवेतबाळासाहेब पाटील,बाळासाहेब गीते,आशिष हिरे,विजय पाटिल,संजय भामरे,मकरंद सोमवंशी, योगेश गांगुर्डे,उमेश चव्हाण, डॉ वैभव महाले,मुकेश शेवाळे,अमोल पाटिल,गणेश अरींगळे, प्रितम भामरे,हर्षल चव्हाण, प्रा.अमोल पाटिल,कमलेश कमानकर,अजय पाटील, सुनिल आहिरे,राकेश ढेमसे आदी