पिंपळगाव बसवंत शहरातील किराणा दुकान १२ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 06:54 PM2021-04-20T18:54:12+5:302021-04-20T18:54:45+5:30

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असतांना बेड ऑक्सिजन, रेमडीसिविर आदीच्या तुडवडीने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गाव बंद ठेवावे लागेल यासाठी पिंपळगाव ग्रामस्थ, व्यापारी नागरिक व सर्वपक्षीय बैठक प्रशासनाच्या उपस्थित संपन्न झाली, त्यात २१ ते ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अत्यावश्यक असणारे किराणा दुकाने देखील बंद असतील असा निर्णय किराणा असोशियनने स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.

Grocery store in Pimpalgaon Baswant closed for 12 days | पिंपळगाव बसवंत शहरातील किराणा दुकान १२ दिवस बंद

पिंपळगाव बसवंत शहरातील किराणा दुकान १२ दिवस बंद

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना साखळी तोडण्यासाठी किराणा असोशियनचा निर्णय

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असतांना बेड ऑक्सिजन, रेमडीसिविर आदीच्या तुडवडीने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गाव बंद ठेवावे लागेल यासाठी पिंपळगाव ग्रामस्थ, व्यापारी नागरिक व सर्वपक्षीय बैठक प्रशासनाच्या उपस्थित संपन्न झाली, त्यात २१ ते ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अत्यावश्यक असणारे किराणा दुकाने देखील बंद असतील असा निर्णय किराणा असोशियनने स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी प्रशासनाकडून कडक निर्बंध घालून देखील रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासन पूर्ण धास्तावले आहे. त्याअनुषंगाने काहीतरी योग्य निर्णय घेऊन या कोरोनाच्या महामारीला हद्दपार कसे करायचे यासाठी सर्व पिंपळगावकरांनी प्रशासनाच्या उपस्थित एकत्रित बैठक घेतली त्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्ताने बंद ठेवून १० दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला.
मात्र रुग्ण संख्या आटोक्यात आणायची असेल तर आपणही पुढाकार घ्यावा या उद्देशाने किराणा असोशियन यांनी देखील स्वयंस्फूर्तीने बारा दिवस किराणा मालाचे दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पिंपळगाव बसवंत शहरातील बाजारपेठ निर्मनुष्य झाली आहे नेहमी गजबजलेला परिसर देखील सुन्न झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिंपळगावची कोरोना महामारीची साखळी तुटेल अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आपण देखील आपल्या गावाचा परिवाराचा विचार करणे गरजेचे आहे. आपले पण काही गावासाठी देणे आहे त्यामुळे स्वयंस्फूर्तीने किराणा असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत किराणा दुकाने देखील १२ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.
- संदीप कागदे, सेक्रेटरी,
किराणा व्यापारी असोसिएशन. पिंपळगाव बसवंत.

Web Title: Grocery store in Pimpalgaon Baswant closed for 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.