यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:41+5:302021-03-13T04:26:41+5:30

येथील पंचायत समिती कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. गटविकास अधिकारी एम.पी. मुरकुटे यांच्या हस्ते ...

Greetings to Yashwantrao Chavan | यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

येथील पंचायत समिती कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. गटविकास अधिकारी एम.पी. मुरकुटे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी.एस. चित्ते, पंचायत समितीच्या माजी सभापती सुमन बर्डे, अनिल सानप, वरिष्ठ सहाय्यक एस.वाय. उगले, धनंजय डावरे, सोमनाथ घारे, गणेश वाजे, दिलीप पाटील, महेश साळी, कल्याणी जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-----------------------

चव्हाण ग्रामीण पतसंस्था

वावी : संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे माजी उपपंतप्रधान व संरक्षणमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुक्यातील वावी येथील कै. यशवंतराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत अभिवादन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष रघुनाथ यादव, ज्येष्ठ संचालक विठ्ठल उगले, जिल्हा बँकेचे संचालक कैलास निरगुडे, दिलीप वेलजाळी, नंदकिशोर गोराणे, व्यवस्थापक संजय कहांडळ व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो - १२ यशवंतराव चव्हाण

सिन्नर तालुक्यातील वावी येथील कै. यशवंतराव चव्हाण पतसंस्थेत चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी कैलास निरगुडे, संजय शिंदे, रघुनाथ यादव, विठ्ठल उगले, दिलीप वेलजाळी, नंदकिशोर गोराणे, व्यवस्थापक संजय कहांडळ आदी.

===Photopath===

120321\12nsk_23_12032021_13.jpg

===Caption===

फोटो - १२ यशवंतराव चव्हाण सिन्नर तालुक्यातील वावी येथील कै. यशवंत चव्हाण पतसंस्थेत चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी कैलास निरगुडे, संजय शिंदे, रघुनाथ यादव, विठ्ठल  उगले, दिलीप वेलजाळी, नंदकशोर गोराणे, व्यवस्थापक संजय कहांडळ आदि.  

Web Title: Greetings to Yashwantrao Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.