शिवसेना कार्यालयात ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:15 IST2021-01-25T04:15:17+5:302021-01-25T04:15:17+5:30

यावेळी बडगुजर यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार वसंतभाऊ गीते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, ...

Greetings to Thackeray at Shiv Sena office | शिवसेना कार्यालयात ठाकरे यांना अभिवादन

शिवसेना कार्यालयात ठाकरे यांना अभिवादन

यावेळी बडगुजर यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार वसंतभाऊ गीते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर, माजी महापौर यतिन वाघ, या मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

शिवसेना राजकीय पक्ष असला तरी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असा मूलमंत्र त्यांनी दिला, असे सांगून त्यांच्या या सेवाव्रतामुळेच शिवसेना आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहेाचल्याचे बडगुजर यांनी सांगितले. कार्यक्रमास युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, भाविसेचे जिल्हाध्यक्ष वैभव ठाकरे, तसेच जगनराव आगळे, सचिन मराठे, प्रकाश मस्के, महिला आघाडी संघटक मंदा दातीर,श्यामला दीक्षित, नगरसेवक प्रवीण तिदमे, डी. जी. सूर्यवंशी, हर्षदा बडगुजर, सुनील गोडसे, योगेश बेलदार ,सचिन बांडे, राजेंद्र वाकसरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

.... छायाचित्र आर फोटोवर २३ शिवसेना भवन- शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आयाेजित कार्यक्रमाप्रसंगी खासदार हेमंत गोडसे व महानगर सुधाकर बडगुजर यांच्यासह शोभा मगर,श्यामला दीक्षित, मंदा दातीर, सत्यभामा गाडेकर, सचिन मराठे, वसंत गीते, दत्ता गायकवाड, यतीन वाघ, विनायक पांडे, अजय बेारस्ते, विलास शिंदे, मामा ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक.

Web Title: Greetings to Thackeray at Shiv Sena office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.