सिन्नरला राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:14 PM2020-06-27T17:14:20+5:302020-06-27T17:17:27+5:30

सिन्नर: आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना १४६ व्या जयंती निमीत्त महामित्र परिवार व आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

Greetings to Sinnar to Rajshri Shahu Maharaj | सिन्नरला राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन

सिन्नर येथे महामित्र परिवार व आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी दत्ता वायचळे, रामू इदे,विजय मुठे,अभिषेक जाधव,सनी उगले आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देराजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण


सिन्नर: आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना १४६ व्या जयंती निमीत्त महामित्र परिवार व आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा चालवणारे राजे म्हणजे राजश्री शाहू महाराज ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते.शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. 
या प्रसंगी रामु इदे,विजय मुठे,अभिषेक जाधव,सनी उगले,अभिशा वायचळे,आरोव वायचळे आदि उपस्थित होते.

 

 

Web Title: Greetings to Sinnar to Rajshri Shahu Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.