शरद जोशी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:18 IST2020-09-07T21:32:42+5:302020-09-08T01:18:48+5:30
देवगाव : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी संघर्ष करून त्यांना वेळोवेळी संघटित करून एक योद्धा शेतकरी म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण केल्याचे उद्गार त्र्यंबकराव चव्हाणके यांनी काढले.

रुई येथे शेतकरी संघटनेचे कै. शरद जोशी यांना अभिवादन करताना शिवनाथ जाधव, बाबासोहब पोटे, ज्ञानेश्वर तासकर, संजय तासकर, वैभव तासकर नवनाथ तासकर आदी.
देवगाव : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी संघर्ष करून त्यांना वेळोवेळी संघटित करून एक योद्धा शेतकरी म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण केल्याचे उद्गार त्र्यंबकराव चव्हाणके यांनी काढले.
निफाड तालुक्यातील रु ई येथे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माधवराव पोटे होते. यावेळी योद्धा शेतकरी सेवाभावी संस्थेचे अनावरण करण्यात आले. रयत क्र ांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, नाशिक विभागीय म्हाडा संचालक बाबासाहेब पोटे, सिद्धेश्वर पतसंस्थेचे चेअरमन संपत रोटे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर तासकर, नवनाथ तासकर, संजय तासकर, अनिल तासकर, ज्ञानदेव गायकवाड, बाजीराव कोकाटे, जगन तासकर आदी उपस्थित होते. (वा.प्र.)