आद्य क्र ांतिकारकांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 17:48 IST2018-11-12T17:48:06+5:302018-11-12T17:48:38+5:30
पेठ : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, संकल्प आदी युवा संघटना, कोळी महासंघ, यशोदीप कला, क्र ीडा मंडळ पेठ व शिक्षक संघटना, इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ शहरात आदिवासी क्र ांतिकारकांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. देवाजी राउत चौकात राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा, देवजी राऊत यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

पेठ येथे क्र ांतिकारक राघोजीभांगरे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करताना आदिवासी बांधव.
पेठ : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, संकल्प आदी युवा संघटना, कोळी महासंघ, यशोदीप कला, क्र ीडा मंडळ पेठ व शिक्षक संघटना, इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ शहरात आदिवासी क्र ांतिकारकांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. देवाजी राउत चौकात राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा, देवजी राऊत यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
क्र ांतिकारक देवाजी राऊत चौकातून दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. बलसाड रोड मार्गे रॅली हुतात्मा स्मारक येथे आल्यानंतर पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून पेठ बाजारपट्टी-सुलभानगर-बलसाड रोड मार्गे पुन्हा देवाजी राऊत चौकात रॅली आल्यानंतर समारोप करण्यात आला. यावेळी तुषार रामदास चारोस्कर, नगराध्यक्ष मनोज घोंगे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गवळी, छगन चारोस्कर, गिरीश गावित, चेतन खंबाईत, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, कॉँग्रेस शहराध्यक्ष याकूब शेख, जितू जाधव, कीर्तीकुमार महाले, शरद पवार, हरिदास भुसारे, नितीन हलकंदर, शेखर काळे, हरिभाऊ चौधरी, हेमंत भोये, भरत पवार, हेमंत चौधरी, छगन नाठे, अमोल भुसारे, मनोज मार्ग, अमोल भुसारे, गौरव राऊत यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
देवजी राऊत चौकात प्रतिमापूजन
आदिवासी आद्य क्र ांतिकारक देवजी राऊत यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष मनोज घोंगे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, पंचायत समिती सदस्य विलास अलबाड, गटनेते भागवत पाटील, नगरसेवक प्रकाश धुळे, किरण भुसारे, चंद्रशेखर काळे आदी उपस्थित होते.