मौजे सुकेणे विद्यालयात समाजदिनानिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:25+5:302021-08-20T04:19:25+5:30
प्रारंभी विद्यालयातील कलामंच व संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे यांनी समाज गीत सादर केले .अध्यक्षस्थानी माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष महंत ...

मौजे सुकेणे विद्यालयात समाजदिनानिमित्त अभिवादन
प्रारंभी विद्यालयातील कलामंच व संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे यांनी समाज गीत सादर केले .अध्यक्षस्थानी माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष महंत आचार्यप्रवर प.पू मनोहर शास्त्री सुकेणेकर होते. समाजदिन ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या आद्य संस्थापकांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब शिंदे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने अश्विनी भंडारे ,शिक्षकांच्या वतीने मुकुंद ताकाटे, शकुंतला गिरी यांनी, तर अतिथींच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास गाडे, डॉ. बाळासाहेब मत्सागर, बाळासाहेब जाधव , मनोहर शास्त्री सुकेणेकर यांनी विचार मांडले. समाज दिनाचे औचित्य साधून महंत मनोहर शास्त्री सुकेणेकर यांच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी बाळासाहेब जाधव, डॉ. रवींद्र जाधव, सुरेश घुगे, दिनकर बोडके, धोंडीराम नाना जाधव, सरपंच संदीप कातकडे, चंद्रभान हळदे, सुनंदा टरले, उपप्राचार्य शांताराम गायकवाड आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. परिचय विलास डेरले, भारत मोगल यांनी, तर आभार शंकर सांगळे यांनी मानले.