सावानात कुसुमाग्रजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:27 IST2021-02-28T04:27:37+5:302021-02-28T04:27:37+5:30

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन रेखा भांडारे ...

Greetings to McCarthy in Savannah | सावानात कुसुमाग्रजांना अभिवादन

सावानात कुसुमाग्रजांना अभिवादन

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन रेखा भांडारे यांच्या हस्ते करण्यात आले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांविषयी भावना व्यक्त करताना दंडवत ही कविता त्यांनी सादर केली. दोन प्रतिभावंत कवी ग्रेस व कुसुमाग्रज यांची अलौकिक भेट कशी झाली. अशा विविध आठवणी तात्यासाहेबांविषयी बोलताना त्यांनी सांगितल्या. यावेळी बी. जी. वाघ, भानुदास शौचे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य सचिव गिरीश नातू यांनी केले. ग्रंथसचिव देवदत्त जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाचनालयाचे कार्याध्यक्ष वसंत खैरनार, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, बालभवन प्रमुख संजय करंजकर, श्रीकांत बेणी यांच्यासह वाचक सभासद उपस्थित होते.

फोटो

२७सावाना कुसुमाग्रज

Web Title: Greetings to McCarthy in Savannah