पेठ तालुक्यात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST2021-06-10T04:10:51+5:302021-06-10T04:10:51+5:30

नगरपंचायत कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. बलसाड रोडवरील हुतात्मा स्मारकात सोशल ...

Greetings to Krantisurya Birsa Munda in Peth taluka | पेठ तालुक्यात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन

पेठ तालुक्यात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन

नगरपंचायत कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. बलसाड रोडवरील हुतात्मा स्मारकात सोशल नेटवर्किंग फोरम अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. पेठ शासकीय मुलांचे वसतिगृह, संकल्प आदी युवा हरसूल पेठ यांच्या वतीने क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. पेठ पंचायत समिती माजी सभापती अंबादास चौरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते वामन खरपडे, निलेश चौधरी, गौरव चौधरी, सचिव राहुल चौधरी, पोपट महाले, प्रमोद चौधरी, दीपक गावित,अमृत तरवारे व आदिवासी बांधव उपस्थित होते.

---------------------

पेठ येथील हुतात्मा स्मारक येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना विद्यार्थी. (०९ पेठ २)

===Photopath===

090621\09nsk_12_09062021_13.jpg

===Caption===

०९ पेठ २

Web Title: Greetings to Krantisurya Birsa Munda in Peth taluka