केशवराव राजेगावकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST2021-04-04T04:14:17+5:302021-04-04T04:14:17+5:30

---------------------- शहा येथे सौर पथदीप वावी : तालुक्याच्या पूर्व भागातील शहा येथे सौर पथदीपांची उभारणी करण्यात आली. जिल्हा नियोजन ...

Greetings to Keshavrao Rajegaonkar | केशवराव राजेगावकर यांना अभिवादन

केशवराव राजेगावकर यांना अभिवादन

----------------------

शहा येथे सौर पथदीप

वावी : तालुक्याच्या पूर्व भागातील शहा येथे सौर पथदीपांची उभारणी करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या अपारंपरिक ऊर्जा विकास योजनेतून शहा येथील आंबेडकर नगर, धनगर ओढा, बिरोबा मंदिर या तीन ठिकाणी सौर पथदिव्यांची उभारणी करण्यात आली.

--------------------

पाताळेश्वर विद्यालयात योगासनांचे धडे

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षक यांना योगासनाचे धडे देण्यात आले. कोरोना काळात संकटाचा सामना करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून हा उपक्रम विद्यालयात राबविण्यात येत आहे.

----------------------

मानोरीत रक्तदान शिबिराला प्रतिसाद

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे कानसा वारणा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य तसेच ग्रामस्थ आणि तरूण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी कानसा वारणा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष सागर सानप, काणसा वारणा फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष आदित्य चकणे, डॉ. विकास मेदगे आदी उपस्थित होते.

---------------------

उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक त्रस्त

सिन्नर : शहर व तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढण्यास सुरूवात झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारी शहरातील रस्ते निर्मनुष्य असतात. तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरात उकाडा सहन करावा लागत आहे.

Web Title: Greetings to Keshavrao Rajegaonkar