रासाका स्थळी कर्मवीरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST2021-07-03T04:10:53+5:302021-07-03T04:10:53+5:30

समितीने रासाका सुरू करावा यासाठी गत एक वर्षापासून उपोषण, आंदोलने केली होती. आमदार दिलीप ...

Greetings to Karmaveer at Rasaka place | रासाका स्थळी कर्मवीरांना अभिवादन

रासाका स्थळी कर्मवीरांना अभिवादन

समितीने रासाका सुरू करावा यासाठी गत एक वर्षापासून उपोषण, आंदोलने केली होती. आमदार दिलीप बनकर यांच्या स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी पतसंस्थेला रासाका हा भाडेपट्टा कराराने देण्यात आला आहे. समितीच्या लढ्याला एक वर्ष पूर्ण झाल्याने रासाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे व समितीचे सदस्य यांनी रासाका कार्यस्थळावर कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आरपीआय पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय गायकवाड, रासाका कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक कुशारे, गणपतराव मोरे महाविद्यालयाचे शालेय समितीचे सदस्य अशोक वाघ, बाळासाहेब आहेर, काकासाहेब वाघ, हंगामी कामगार पतसंस्थेचे संचालक संजय वाघ, रासाका बचाव कृती समितीचे सदस्य बाबूराव सानप, सचिन वाघ, हेमंत सानप, आशुतोष काळे यांच्यासह कामगार उपस्थित होते.

Web Title: Greetings to Karmaveer at Rasaka place