जिल्ह्यात गांधी, शास्त्री यांना अभिवादन
By Admin | Updated: October 3, 2014 00:48 IST2014-10-03T00:47:27+5:302014-10-03T00:48:05+5:30
जिल्ह्यात गांधी, शास्त्री यांना अभिवादन

जिल्ह्यात गांधी, शास्त्री यांना अभिवादन
नाशिक : जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शाळा- महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
केबीएच विद्यालय, शेरूळ मालेगाव तालुक्यातील शेरूळ येथील केबीएच विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. जे. अहिरे होते. कोमल महाले, पूजा महाले, मयूर बावीस्कर, अजय चव्हाण यांची भाषणे झाली. सौ. देसले व इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ कॅम्पातील साने गुरुजी विद्या मंदिरात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीमती कुलकर्णी होत्या. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ अभियानांतर्गत जनजागृती फेरी काढण्यात आली. मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी- विद्यार्थिनींची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमास सर्व शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.