राष्ट्र सेवा दलातर्फे गायकवाड यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST2021-02-08T04:13:20+5:302021-02-08T04:13:20+5:30

मालेगाव : तालुक्याचे भूमिपुत्र, बडोदा संस्थानचे आदर्श महाराजा सयाजीराव गायकवाड यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे अभिवादन करण्यात ...

Greetings to Gaikwad from Rashtra Seva Dal | राष्ट्र सेवा दलातर्फे गायकवाड यांना अभिवादन

राष्ट्र सेवा दलातर्फे गायकवाड यांना अभिवादन

मालेगाव : तालुक्याचे भूमिपुत्र, बडोदा संस्थानचे आदर्श महाराजा सयाजीराव गायकवाड यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे अभिवादन करण्यात आले.

कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख, राज्य सचिव नचिकेत कोळपकर, शरद कोकाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय महासचिव देशमुख यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी सेवा दल उपक्रमांबाबत संवाद साधला. कार्यक्रमाला जिल्हा संघटक रविराज सोनार, तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंखे, सेवा दल मंडळ सदस्य स्वाती वाणी, मालेगाव ब्लड डोनर ग्रुपचे सोहेल डॉलरिया, साधना कलामंचचे प्रवीण वाणी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष डॉ. संदीप खैरनार, साधना वाचनालयाचे अशोक पठाडे, राजेंद्र जाधव, समाजवादी पक्षाचे शरीफ मन्सुरी, कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड वाजीद आदींसह विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी कर्मवीर या. ना. जाधव यांच्या समाधीला अभिवादन करून मालेगावात सेवा दल कार्यकर्त्यांनी उभारलेल्या विविध संस्थांना भेट दिली. कोविड काळातील दिवंगत सेवा दल सैनिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला.

Web Title: Greetings to Gaikwad from Rashtra Seva Dal