शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मृतिदिनी दिंडोरी तालुक्यात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:15 PM2020-08-03T17:15:04+5:302020-08-03T17:20:37+5:30

दिंडोरी : जवान यशवंत ढाकणे यांचा ३ आॅगस्ट हा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून दिंडोरी तालुक्यात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त तळेगाव दिंडोरी या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचे पूजन व ध्वजारोहण माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर खांदवे यांच्या हस्ते करण्यात आले.

Greetings in Dindori taluka on the memorial day of martyr Yashwant Dhakne | शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मृतिदिनी दिंडोरी तालुक्यात अभिवादन

शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मृतिदिनी दिंडोरी तालुक्यात अभिवादन

googlenewsNext
ठळक मुद्दे जन्मगावी त्यांच्या स्मारकाचे पूजन

दिंडोरी : जवान यशवंत ढाकणे यांचा ३ आॅगस्ट हा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून दिंडोरी तालुक्यात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त तळेगाव दिंडोरी या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचे पूजन व ध्वजारोहण माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर खांदवे यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रगीत व ध्वजगीत उन्नती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे बाळासाहेब ढाकणे, चंद्रकांत धात्रक, अमर निरगुडे, रमेश सूर्यवंशी तसेच वीरजवान शहीद यांचे वडील अर्जुन ढाकणे, संतोष कथार, सरपंच माधव चारोस्कर, व्ही. एन. शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब चकोर, पोलीसपाटील रोशन परदेशी, सदस्य गोकुळ चौधरी, ग्रामसेविका एस. वाय. बत्तीसे, माजी सरपंच दत्ता ढाकणे, गोपीनाथ ढाकणे, सोसायटीचे उपसभापती गोविंद ढाकणे, माजी सभापती श्याम परदेशी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक यू. एस. जाधव, उन्नती विद्यालयाचे दिलीप केल्हे, स्व. यशवंतचे बंधू दिनकर ढाकणे, शरद ढाकणे, प्रतीक ढाकणे, ग्रामपंचायत कर्मचारी व्ही. एस. बेंडकुळे, एस. बी. चारोस्कर आदी उपस्थित होते.

उन्नती माध्यमिक विद्यालय
उन्नती माध्यमिक विद्यालयात शाहीद यशवंत ढाकणे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माजी सैनिक संघटनेच्या वतीने प्रथम पाच क्र मांक विद्यार्थ्यांचा माजी सैनिकांच्या हस्ते पुष्प व मास्क देऊन सन्मान करण्यात आला व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक दिलीप केल्हे, आर. बी. कोठावदे, किशोर क्षीरसागर व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव दिंडोरी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शहीद यशवंत ढाकणे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक उल्का जाधव, अशोक देवरे, पुष्पा मौले, वंदना आहेर, कुंदा पाटोळे, प्रकाश भामरे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings in Dindori taluka on the memorial day of martyr Yashwant Dhakne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.