पेठ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, डांग सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, कर्मवीर दादासाहेब बीडकर यांना अभिवादन करण्यात आले. येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य कल्पना शिरोरे यांच्या हस्ते दादासाहेब बीडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण या ठिकाणी निवासी शाळा सुरू करून वंचित घटकांना शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली. याप्रसंगी उपमुख्याध्यापक राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक एस. जी. महाजन, उपप्राचार्य जयश्री पवार, सतीश चंद्रात्रे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
दादासाहेब बीडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:35 IST