स्वातंत्र्यवीर आत्मार्पणदिनी भाजपातर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:18 IST2021-02-27T04:18:27+5:302021-02-27T04:18:27+5:30

भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी आत्मार्पणदिनी नाशिकरोड ते भगूर पदयात्रा काढून सावरकरांना अभिवादन करण्यात येते. यावर्षी कोविड परिस्थितीमुळे पदयात्रा ...

Greetings from BJP on Independence Day | स्वातंत्र्यवीर आत्मार्पणदिनी भाजपातर्फे अभिवादन

स्वातंत्र्यवीर आत्मार्पणदिनी भाजपातर्फे अभिवादन

भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी आत्मार्पणदिनी नाशिकरोड ते भगूर पदयात्रा काढून सावरकरांना अभिवादन करण्यात येते. यावर्षी कोविड परिस्थितीमुळे पदयात्रा न काढता थेट भगूरला जाऊन तेथील स्वा.सावरकर स्मारकात भाजपा पदाधिकाऱ्यांनी कोरोना नियमाचे पालन करून अभिवादन केले. यावेळी भाजपाचे नेते लक्ष्मण सावजी यांनी उत्कट देशभक्तीने भारावलेले सावरकर यांचे विचार कालजयी होते, असे सांगितले. याप्रसंगी मधुसुदन गायकवाड, अमित घुगे, सुजाता जोशी, देवदत्त जोशी, ऋषिकेश आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपाचे विलास कुलकर्णी, अमोल इघे, मनीष बागुल, ऋषिकेश ठाणगावकर, भगवान काकड, प्रशांत वाघ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच भगूर शहरातील शिवाजी चौक येथे आयोजित चित्रकार योगेंद्र पाटील यांच्या सावरकरांवरील चित्रप्रदर्शनास भाजपा पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.

फोटो

२६ सावरकर स्मारक

स्वातंत्र्यवीर स्मारकात अभिवादनप्रसंगी लक्ष्मण सावजी, मधुसुदन गायकवाड, अमित घुगे, सुजाता जोशी, देवदत्त जोशी, ऋषिकेश आहेर आदी.

Web Title: Greetings from BJP on Independence Day