अहिल्यादेवी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:39 IST2018-06-01T00:39:04+5:302018-06-01T00:39:04+5:30

दिंडोरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राजापूर (ता. दिंडोरी) येथील राजमाता मित्रमंडळाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

Greetings to Ahilyadevi | अहिल्यादेवी यांना अभिवादन

अहिल्यादेवी यांना अभिवादन

दिंडोरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राजापूर (ता. दिंडोरी) येथील राजमाता मित्रमंडळाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिमापूजन सरपंच चंद्रकला गवारे, उपसरपंच बबन देशमुख, पोलीसपाटील मनोज आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान वाल्मीक ऋषी यांच्याही प्रतिमांचे पूजन करून ग्रामस्थांनी गावातील सामाजिक ऐक्य दाखवून दिले. प्रास्ताविक सुरेश गावडे तर आभार गणेश गावडे यांनी मानले. सूत्रसंचालन धनंजय वानले यांनी केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी वसंत गावडे, शिवाजी गावडे, निवृत्ती गावडे, राजेंद्र जाधव, आप्पासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, श्याम देवकर, प्रताप देशमुख यांनी प्रयत्न केले.

Web Title: Greetings to Ahilyadevi