‘केटीवेअर’साठी हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST2017-08-06T23:43:39+5:302017-08-07T00:09:48+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाºया ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रालगत गणपती मंदिराजवळील नियोजित असलेल्या के.टी.वेअर बंधाºयाच्या जागेसह जॅकवेल विहिरीची जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी पाहणी केली. या केटीवेअर बंधाºयाच्या कामासाठी जिल्हाधिकाºयांनी हिरवा कंदील दिल्याने सटाणा, देवळा शहरासह चौदा गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

‘केटीवेअर’साठी हिरवा कंदील
सटाणा : शहराला पाणीपुरवठा करणाºया ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रालगत गणपती मंदिराजवळील नियोजित असलेल्या के.टी.वेअर बंधाºयाच्या जागेसह जॅकवेल विहिरीची जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी पाहणी केली. या केटीवेअर बंधाºयाच्या कामासाठी जिल्हाधिकाºयांनी हिरवा कंदील दिल्याने सटाणा, देवळा शहरासह चौदा गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन प्रथमच बागलाण तालुका दौºयावर आले असता प्रांताधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार सुनील सैंदाणे, देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार, पालिका गटनेते संदीप सोनवणे आणि नगरपालिका अधिकाºयांसमवेत संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. मालेगावला पाणीपुरवठा करणाºया तळवाडे तलावाची साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेच्या आवर्तनातील अंतर वाढले आहे. त्यामुळे यादरम्यानच्या काळातच शहराला अकस्मात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या नियोजित बंधाºयामुळे ती तूट भरून निघण्यास मदत होणार असल्याने शहरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी गळ यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना घातली. यावेळी सटाणा व देवळा शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा पात्रात गणपती मंदिराजवळ कोल्हापूर टाइप बंधारा बांधल्यास दोन्ही शहरांसोबत परिसरातील चौदा गावांची पाणीसमस्या सोडविता येईल, असे आमदार डॉ. राहुल अहेर व नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाºयांनी हा दौरा केला. यावेळी नगरसेवकांसह दत्तू बैताडे, श्याम बगडाणे, संजय सोनवणे व कर्मचारी उपस्थित होते.