शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

मखमलाबादला ग्रीन फिल्ड; महासभा अंतिम निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 1:10 AM

स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरातील मखमलाबाद शिवारात सातशे एकर क्षेत्रात नगर विकासाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून, त्यामुळे कंपनीच्या लोकप्रतिनिधी असलेल्या काही संचालकांनी बैठकीत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रकल्प रोखण्याची मागणी केली. त्यामुळे या प्रकल्पाबाबत महासभा घेईल तोच अंतिम निर्णय असेल,

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरातील मखमलाबाद शिवारात सातशे एकर क्षेत्रात नगर विकासाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून, त्यामुळे कंपनीच्या लोकप्रतिनिधी असलेल्या काही संचालकांनी बैठकीत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रकल्प रोखण्याची मागणी केली. त्यामुळे या प्रकल्पाबाबत महासभा घेईल तोच अंतिम निर्णय असेल, असे स्पष्टीकरण कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी बैठकीत दिल्याचे वृत्त आहे. याशिवाय केंद्र सरकारचा निधी राज्य सरकारला देण्यास विरोध करण्यात आला असून, यासंदर्भात राज्य शासनाशी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले आहे.  नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशनच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी (दि. २८) झाली. यावेळी ही चर्चा झाल्याचे समजते.अध्यक्षस्थानी सीताराम कुंटे होते. त्याचप्रमाणे महापौर रंजना भानसी, आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल आदींसह मनपाचे पदाधिकारी संचालक उपस्थित होते. या बैठकीच्या प्रारंभीच कंपनीच्या वतीने सुरू असलेली कामे आणि प्रस्ताव याबाबत अधिकाºयांनी सादरीकरण केले. मात्र, त्यावर सदस्यांनी कामे होण्याच्या आत किंवा महासभेत सादर करण्याच्या आत माहिती मिळणे आवश्यक होते, असे स्पष्ट केले. नगररचना योजना मखमलाबाद शिवारात राबविण्यास स्थानिक शेतकºयांचा कडाडून विरोध असून, गुरुवारी (दि. २७) शेतकºयांनी बैठक घेऊन विरोध करण्याचे आवाहन केले आहे, हे लोकप्रतिनिधी असलेल्या संचालकांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी हरित क्षेत्र विकासाअंतर्गत मखमलाबाद येते होणाºया प्रकल्पाबाबत महासभा अंतिम निर्णय घेणार असून, तो स्मार्ट सिटीला मान्य असेल, असे सांगितल्याचे वृत्त आहे.  स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात आॅप्टिक फायबरचे जाळे विणून सीसीटीव्हीसह अन्य सुविधा देणाºया आयसीटी (इंटिग्रेटेड कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर, आयटीएमएस) राज्य शासनाने महाआयटीला निधी वर्ग करण्याची मागणी केली आहे. मात्र, यासंदर्भात आयुक्तांनी केंद्र सरकारशी संपर्क साधला असता केंद्राकडून मिळालेला निधी राज्य सरकारकडे वर्ग करण्याबाबत प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. सदरचा प्रकल्प स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर यांच्या निर्देशानुसार स्मार्ट सिटी कंपनीद्वारेच करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भात माहिती, तंत्रज्ञान व नगर विकास या खात्यांच्या प्रधान सचिवांशी एकत्रित चर्चा करून या विषयावरून तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले.यावेळी स्मार्ट सिटी निधीतून करावयाच्या प्रकल्पांची अद्ययावत सूची विचारात घेऊन त्यास मान्यता देण्यात आली. तसेच कंपनीच्या दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभादेखील घेण्यात आली. योवेळी लेखा परीक्षित वित्तीय विवरणपत्र, संचालक मंडळ आणि लेखा परीक्षकांचा अहवाल मान्य करण्यात आला. बैठकीस रेणू सतिजा, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, दिनकर पाटील, अजय बोरस्ते, शाहू खैरे, तुषार पगार, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल उपस्थित होते.कालिदास दर ही खासगी बाबमहापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शाहू खैरे यांनी कालिदास कलामंदिराच्या दरवाढीविषयी मुद्दा मांडला. आधी कलामंदिर हे कलावंतांना वापरू द्या असे त्यांनी सांगितले; मात्र कंपनीचे काम बांधून देण्याचे होते, दरवाढ ही खासगी बाब असल्याचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी सांगितले. कन्व्हर्जन अंतर्गत सुंदर नारायण मंदिराचे काम योग्य रीतीने होत नसल्याची तक्रारही खैरे यांनी केली. याशिवाय अन्य अनेक बाबतीत काही लोकप्रतिनिधी सदस्यांनी चर्चा करताना तक्रारी केल्या. महापालिकेचे केवळ दोन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाला स्थगिती आली आहे, स्मार्ट रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून नागरिकांची अडचण झाली आहे, अशा तक्रारी करण्यात आल्या.महापौरांची तक्रारमहापौर रंजना भानसी यांच्यासह काही सदस्यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल हे उपलब्ध होत नाही आणि अन्य तक्रारीदेखील केल्या.सर्व संचालकांना मुदतवाढयावेळी आयुक्त तुकाराम मुंढे, हिमगौरी आडके, दिनकर पाटील, अजय बोरस्ते, शाहू खैरे, गुरुमितसिंग बग्गा यांच्या बरोबरच स्वतंत्र संचालक असलेले भास्करराव मुंढे आणि सनदी लेखापाल तुषार पगार यांची चालक मंडळाने केलेली नियुक्ती नियमित करण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी