महामस्तकाभिषेकाची जय्यत तयारी
By Admin | Updated: February 17, 2016 23:23 IST2016-02-17T23:22:02+5:302016-02-17T23:23:31+5:30
मांगीतुंगी : प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

महामस्तकाभिषेकाची जय्यत तयारी
मांगीतुंगी : येथील भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट विशालकाय मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सात दिवसांच्या पंचकल्याणक विधी विविध मंत्रोचारात विधिवत पूजेने उत्साहात संपन्न झाला. आजपासून (दि.१८) भगवान वृषभदेवाच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याला
प्रारंभ होणार असून, सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
भगवान वृषभदेवाचा गेल्या ११ फेब्रुवारीपासून येथील सर्वतोभद्र महलात सलग सात दिवस गणिनीप्रमुख ज्ञानमती माता, चंदनामती माता, रवींद्रकीर्ती स्वामी, आचार्य अनेकांतसागर महाराज यांच्यासह सात पुरोहितांच्या मंत्रोचाराने विधिवत पूजा करून कल्याणक सोहळ्याने मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.दरम्यान आजपासून (दि.18) मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याला प्रारंभ होत आहे.हा अभिषेक पाचहजार लिटर दुध ,दोन टन दही,एक टन तुपाने करण्यात येणार आहे.सकाळी 7 वाजेपासून या सोहळ्यास सुरु वात होणार असून तीन टन विविध प्रकारचे फुले देखील आणली आहेत .या सोहळ्यासाठी सात प्रमुख पुरोहितांच्या हस्ते मंत्रघोष करण्यात येणार आहेत.हा सोहळा दि.18 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत चालणार आहे.या सोहळ्या दरम्यान दररोज सर्वतोभद्र महलात विविध सांस्कृतिक कार्यक्र म ,भिक्तगीते आण िनाटकांचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यासाठी दररोज पंधरा ते वीस हजार भाविक हजेरी लावतील असा अंदाज समतिीने वर्तिवला आहे.त्यामुळे येत्या 23 तारखे पर्यत यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.असे असले तरी पोलीस बळ मात्र कमी करण्यात आले आहे.
मांगीतुंगी: येथील सुरु असलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या पंचकल्यानक महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी दररोज चाळीस ते पन्नास हजार भाविक हजेरी लावत आहेत.या भाविकांसाठी इंदूर येथील अगरबत्ती उद्योजक झांजरी परिवाराने अल्पदरात चहा ,दुध,पोहे आण िउसाचा रस उपलब्ध करून स्वत: सेवा देत असून हा जमा होणारा सर्व पैसा मूर्ती विकासासाठी दान करणार आहेत.
इंदूर येथील भाविक व अगरबत्ती उद्योजक माणकिचंद जैन त्यांचे सुपुत्र विमलकुमार,राजेंद्रकुमार,सतीशकुमार यांच्यासह परिवारातील नऊ सदस्य या सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत.या परिवाराची भगवान ऋषभदेव यांच्यावर अफाट श्रध्दा आण िभक्ती आहे.त्यांनी या सोहळ्यासाठी येणार्या भाविकांसाठी अल्पदरात मिनरल वॉटरच्या बाटल्या ,पोहे,चहा,दुध आण िउसाचा रस उपलब्ध करून देण्याचा मानस होता .या परिवाराने मूर्ती निर्माण समतिीकडे तसा प्रस्ताव सादर केला .त्याला समतिीने सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य सभामंडप जवळ जागा उपलब्ध करून दिली .या जागेवर झांजरी परिवाराने मोफत उसाचा रस,दोन रु पयात पोहे,एक रु पयात चहा,एक रु पयात दुध आण िपाच रु पयात पाण्याची बाटली उपलब्ध करून दिले आहेत.सकाळी साडे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हा सर्व परिवार भाविकांना स्वत: सेवा देत आहे.हा उपक्र म 13 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत ही सेवा सुरु राहणार असून हा जमा होणारा सर्व पैसा मूर्ती विकासासाठी दान करणार आहेत.त्याच्या या उपक्र माला भाविकांकडून उत्स्पुर्थ प्रतिसाद मिळत असून दररोज चाळीस ते पन्नास हजार भाविक या उपक्र माचा लाभ घेत आहेत.