शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:20 IST

आयसीएसई बोर्डाचा निकाल शुक्रवारी (दि. १०) जाहीर झाला असून, देशभरात दहावीचा निकाल ९९.३४ टक्के , तर बारावीचा निकाल ९६.८४ टक्के लागला असून, नाशिकच्या शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. परंतु, कोरोनामुळे काही पेपर होऊ शकलेले नसल्याने काही विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात आल्याने दहावी आणि बारावी दोन्ही निकालांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देआयसीएसईचा निकाल जाहीर : शहरातील शाळांची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

नाशिक : आयसीएसई बोर्डाचा निकाल शुक्रवारी (दि. १०) जाहीर झाला असून, देशभरात दहावीचा निकाल ९९.३४ टक्के , तर बारावीचा निकाल ९६.८४ टक्के लागला असून, नाशिकच्याशाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. परंतु, कोरोनामुळे काही पेपर होऊ शकलेले नसल्याने काही विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात आल्याने दहावी आणि बारावी दोन्ही निकालांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे (आयसीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल शुक्रवारी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना ६६६.ू्र२ूी.ङ्म१ॅ व ६६६.१४२४’३. ू्र२ूी.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याचे आयसीएसईतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.यात नाशिकमधील रायन इंटरनॅशनल स्कूल, अशोका युनिव्हर्सल स्कूल, विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल, होरायझन अकॅडमी, सिल्वर ओक युनिवर्सल स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल आदी शाळांनी आपली शंभर टक्के निकालांची परंपरा कायम राखली आहे.होरायझन अकॅडमीची अश्लेषा शेळके प्रथममविप्रच्या होरायझन अकॅडमीचाही शंभर टक्के निकाल लागला असून अश्लेषा शेळके हिने ९८.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून आदित्य मुंदडा ९७.८० टक्के व चिन्मयी मगरने ९६.८० टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर यश संपादन केले. सिद्धी आव्हाड व क्रिष्णा हेडा अभिजित पाटील, स्वराज देशमानकर आदी विद्यार्थ्यांनीही लक्षवेधी गुण मिळविले आहे. ८२ विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त, ४२ टक्के विद्यार्थिना उत्कृष्ट श्रेणीत, तर १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकSSC Resultदहावीचा निकालSchoolशाळाEducationशिक्षण