दिंडोरी तालुक्यातून मोठा प्रतिसाद

By Admin | Updated: September 24, 2016 23:22 IST2016-09-24T23:21:09+5:302016-09-24T23:22:34+5:30

दिंडोरी तालुक्यातून मोठा प्रतिसाद

Great response from Dindori taluka | दिंडोरी तालुक्यातून मोठा प्रतिसाद

दिंडोरी तालुक्यातून मोठा प्रतिसाद

दिंडोरी : नाशिक येथील मराठा क्र ांती मोर्चाला दिंडोरी तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. दिंडोरीतून सुमारे एक लाखापर्यंत समाजबांधव मार्चात सहभागी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अनेक गावांत शेतकऱ्यांनी शेतकामातून सुटी घेत, तर व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून सहकुटुंब मोर्चाला हजेरी लावली.
तालुक्यातील गावागावांतून हजारो युवक हातात भगवे झेंडे, फलक घेळन अंगात मराठा क्र ांति मोर्चाचा काळा टी-शर्ट घातलेले युवक-युवती शेतकरी, गृहिणी महिला या विविध वाहनांतून मोठ्या उत्साहात सकाळी ८ वाजेपासूनच नाशिककडे रवाना होत होते. दिंडोरी येथून बसेस, स्कुल बस पिकअप द्वारे युवती महिला मोठ्या प्रमाणात मोर्चासाठी रवाना होत होते .अनेक गावांमधे शेतकऱ्यांचा आज मोढा शेतकरी मोर्चात सहभागी झाले. कळवण सुरगाना तालुक्यातील वाहने ही मोठ्या प्रमाणात येत असल्याने वणी कळवन दिंडोरी नाशिक रस्ता भगवे झेंडे लावलेले वाहने त्यात उत्साहात असलेले आंदोलक यांनी गजबजला होता . दिंडोरी तालुक्यातील शेकडो स्वयंमसेवकांनी दिंडोरी रस्ता तसेच पार्किंगच्या ठिकाणी नियोजन केले. दिंडोरी तालुक्यातील हजारो दुचाकीवरु न युवक भगवे झेंडे हातात घेवून सहभागी झाले अनेक आंदोलकांनी न्याहारी व पाणी सोबत घेतले होते. शहरानजीक अनेक बांधवांनी रस्त्याच्या कडेला वाहने लावत झाडाखाली जेवण केले. दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी, वणी, खेडगांव, वरखेडा, लखमापुर, मोहाडी, पालखेड, लोखंडेवाडी, जोपुळ, चिंचखेड, तिसगाव, म्हेळुस्के, अवनखेड, परमोरी, निगडोळ, जनोरी, आंबे दंडोरी, मडकीजाम, पाडे, निलवंडी, हातनोरे, वलखेड, खतवड, कुरणोली, वणी खुर्द उमराले, बोपेगाव, शिंदवड आदि गावांतून हजारो नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
चाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्साह
नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील आरोग्य विद्यापीठाजवळील चिंचबारी येथील चाटे कॉलेजला सुटी देण्यात आली होती. होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर सोडले नव्हते. त्यांनी गेटजवळ उभे राहत भगवा झेंडा फडकवत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत नाशिकला जाणाऱ्या आंदोलकांना चीयरअप केले.
अत्यंत उत्साहात दूरदूर पायी चालून आल्यावरही कुठलाही थकवा मोर्चेकऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसत नव्हता, नाशिक कळवन रस्ता मोर्चा संपल्यावर सायंकाळी ६ वाजे पर्यन्त ओसांडून वाहत होता. अनेकांनी आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाल्याच्या प्रतिक्रि या देत शासनाने आता तरी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या असी अपेक्षा व्यक्त केली़
 

Web Title: Great response from Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.