थोर पुरुषांना मानाचा मुजरा !
By Admin | Updated: August 2, 2015 23:14 IST2015-08-02T23:13:29+5:302015-08-02T23:14:38+5:30
लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजली; अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन

थोर पुरुषांना मानाचा मुजरा !
नाशिक : शहरातील विविध शाळा, संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, संजय गालफाडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुरेशअण्णा पाटील, कुणाल वाघ, प्रशांत जाधव, गिरीश पालवे, डॉ. संध्या तोडकर, सचिन चव्हाण, बबलू परदेशी, पुष्पा शर्मा आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन वशिष्ठ गोळे यांनी केले.
गांधारवाडी शाळा क्र. ९८
गांधारवाडी येथील मनपा शाळा क्र. ९८ मध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विनायक मते यांनी लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती सांगितली. यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत चंचल खरोटे, नीलम कराटे, समृद्धी खराटे, विशाल खराटे, नरेश बदादे, विकी खोडे, अनिता बेंडकुळे आदि विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
व्यंकटराव हिरे विद्यालय
सिडको परिसरातील लोकनेते व्यंकटराव हिरे प्राथमिक विद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातील प्रसंग मुख्याध्यापक सौ. वडघुले, सौ. शिर्के यांनी सांगितले. सूत्रसंचालन अनिता वाघचौर यांनी केले. आभार श्रीमती पाटील यांनी मानले.
गोेपले सेवाभावी संस्था
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती बाबासाहेब गोपले बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी गरजू मुलांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गमाजी घोडे, ओंकार सपकाळ, पंडित डोंगरे, रखमाजी पवार, आसाराम घाटूळ, भागवत कांबळे, सुभाष रणखांब आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे गंजमाळ येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पक्षातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे, महिला आघाडीच्या शीलाताई मोरे, बिपीन कटारे, रोहित दोंदे, वरुण बिंद्रा, मनोहर दोंदे, आतिश कांबळे आदि उपस्थित होते.
मनपा शाळा क्रमांक ३२
सातपूर परिसरातील महानगरपालिका शाळा क्रमांक ३२, ध्रुवनगर येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अमोल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती काळे, सोनवणे, बाबाजी आवरे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक चव्हाण यांनी केले. महाले यांनी आभार मानले.
अभिनव बालविकास मंदिर
मविप्र संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर, गंगापूररोड येथील शाळेत मीनाक्षी गायधनी यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा केली होती.
पेठे विद्यालय
पेठे विद्यालयालयात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन केले. व्यासपीठावर गीता कुलकर्णी, एकनाथ कडाळे, प्रियंका निकम, कुंदा जोशी, कैलास पाटील आदि उपस्थित होते.
बहुजन स्वराज्य महासंघ
बहुजन स्वराज्य महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे प्रतिमापूजन प्रमोद नाथेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष सुभाष चव्हाण, विश्वासराव कांबळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण, किरण फुले, चंद्रकांत अल्लड, अल्ताफ पठाण, अंकुश राऊत आदि उपस्थित होते.
शहर कॉँग्रेस कमिटी
नाशिक शहर कॉँग्रेस कमिटीतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद अहेर, यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी हेमलता पाटील, लक्ष्मण जायभावे, वत्सला खैरे, वंदना मनचंदा, हजिफ बशीर, वसंत ठाकूर, आदि उपस्थित होते.