शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरकरांकडून अग्निशामक जवानांप्रती कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 23:36 IST

सिन्नर : जीवावर उदार होऊन छत्रपती शिवाजी चौकातील सिन्नर शूज मार्टला लागलेली आग आटोक्यात आणणाऱ्या नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या चालकासह सहा सेवकांचा जनसेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देसत्कार : जनसेवा मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

सिन्नर : जीवावर उदार होऊन छत्रपती शिवाजी चौकातील सिन्नर शूज मार्टला लागलेली आग आटोक्यात आणणाऱ्या नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या चालकासह सहा सेवकांचा जनसेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.गेल्या बुधवारी (दि. २) सकाळी दुकानाला आग लागली, तेव्हा माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, मनोज भगत आदींसह परिसरातील रहिवासी मदतीसाठी धावले होते. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर अग्निशमन दलाचे लाला वाल्मिकी, सागर डावरे, जयेश बोरसे, मंगेश कटारनवरे, स्वप्नील कासार, राकेश नलगे, एकनाथ नलगे, यशवंत बेंडकुळे यांनी जीवाची पर्वा न करता दुकानात प्रवेश करून आग आटोक्यात आणली होती.आगीने दुसरा मजला गाठला असता तर गणेश पेठेतील इतर दुकानांनाही झळ बसली असती. मात्र, या सर्व सेवकांनी प्रसंगावधान राखून केलेल्या मदतीमुळेच आगीवर नियत्रंण मिळवणे शक्य झाले. त्यामुळे या सेवकांचा सिन्नरकरांच्या वतीने सत्कार करण्याचे आयोजन केल्याचे रावसाहेब आढाव म्हणाले. जयेश बोरसे याच्या हाताला आग विझवताना भाजल्याच्या जखमाही यावेळी बघायला मिळाल्या. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नेहमीच कर्तव्य बजाविण्यात आघाडीवर असतो. मात्र, कामाची दखल घेऊन सत्कार पहिल्यांदाच होत असल्याची भावना लाला वाल्मिकी यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख गौरव घरटे, प्रमोद चोथवे, सागर गुजर, जितेंद्र जगताप, मनोज भगत, अनिल कवडे, संदीप ठोक, संतोष खर्डे, प्रशांत रायते उपस्थित होते. 

टॅग्स :Fairजत्राSocialसामाजिक