सिन्नरकरांकडून अग्निशामक जवानांप्रती कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 11:35 PM2022-02-05T23:35:42+5:302022-02-05T23:36:37+5:30

सिन्नर : जीवावर उदार होऊन छत्रपती शिवाजी चौकातील सिन्नर शूज मार्टला लागलेली आग आटोक्यात आणणाऱ्या नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या चालकासह सहा सेवकांचा जनसेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Gratitude from Sinnarkar to firefighters | सिन्नरकरांकडून अग्निशामक जवानांप्रती कृतज्ञता

सिन्नर येथे दुकानातील आग विझविणाऱ्या अग्निशमन विभागाच्या सेवकांच्या सत्कारप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे. समवेत जनसेवा मंडळाचे पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देसत्कार : जनसेवा मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

सिन्नर : जीवावर उदार होऊन छत्रपती शिवाजी चौकातील सिन्नर शूज मार्टला लागलेली आग आटोक्यात आणणाऱ्या नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या चालकासह सहा सेवकांचा जनसेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

गेल्या बुधवारी (दि. २) सकाळी दुकानाला आग लागली, तेव्हा माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, मनोज भगत आदींसह परिसरातील रहिवासी मदतीसाठी धावले होते. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर अग्निशमन दलाचे लाला वाल्मिकी, सागर डावरे, जयेश बोरसे, मंगेश कटारनवरे, स्वप्नील कासार, राकेश नलगे, एकनाथ नलगे, यशवंत बेंडकुळे यांनी जीवाची पर्वा न करता दुकानात प्रवेश करून आग आटोक्यात आणली होती.
आगीने दुसरा मजला गाठला असता तर गणेश पेठेतील इतर दुकानांनाही झळ बसली असती. मात्र, या सर्व सेवकांनी प्रसंगावधान राखून केलेल्या मदतीमुळेच आगीवर नियत्रंण मिळवणे शक्य झाले. त्यामुळे या सेवकांचा सिन्नरकरांच्या वतीने सत्कार करण्याचे आयोजन केल्याचे रावसाहेब आढाव म्हणाले. जयेश बोरसे याच्या हाताला आग विझवताना भाजल्याच्या जखमाही यावेळी बघायला मिळाल्या. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नेहमीच कर्तव्य बजाविण्यात आघाडीवर असतो. मात्र, कामाची दखल घेऊन सत्कार पहिल्यांदाच होत असल्याची भावना लाला वाल्मिकी यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख गौरव घरटे, प्रमोद चोथवे, सागर गुजर, जितेंद्र जगताप, मनोज भगत, अनिल कवडे, संदीप ठोक, संतोष खर्डे, प्रशांत रायते उपस्थित होते.
 

Web Title: Gratitude from Sinnarkar to firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.