नाशिकरोड : नाशिकरोड पोलिसांनी वास्को चौकात पाणीपुरीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याकडून गावठी कट्टा जप्त केला आहे. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांना गावठी कट्टा असल्याची पक्की खबर मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक विलास शेलके, पोलीस हवालदार विलास गांगुर्डे, प्रकाश भालेराव, समाधान वाजे, विशाल कुवर, राजेंद्र जाधव, अविनाश जुद्रे यांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचून पाणीपुरी विक्रेता संतू बिहरू राजपूत (रा. रोकडोबावाडी, देवलालीगाव) यांची अंगझडती घेतली. यामध्ये त्याच्या कंबरेला लावलेला २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.शॉक लागून मृत्यूनवीन आडगाव नाका परिसरातील एका इमारतीच्या वाहनतळातील विद्युत रोहित्राला धक्का लागल्याने एका तीस वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाणीपुरी विक्रेत्याकडून गावठी कट्टा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:40 IST