शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:24 IST

जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले आहेत.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा तडाखा : शेतकऱ्यांचे लाखो रुपये पाण्यात

लासलगाव : जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले आहेत.लासलगाव परिसरातील आसपासच्या गावांमध्ये गुरुवारी (दि. २६) सायंकाळी सुमारे एक तास लहान गारांसह तर शुक्र वारी (दि. २७) पहाटे मेघगर्जनेसह जोरदार वारा-वादळात सुमारे दीड तास अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे निमगाव वाकडा, पाचोरे, लासलगाव, ब्राह्मणगाव, विंचूर परिसरातील द्राक्षबागा, कांदा, हरभरा व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरीवर्गाने केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून निमगाव वाकडा व लासलगाव शहर परिसरात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. तसेच वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाºया बदलामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यात निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस व जोरदार वादळाचा फटका शेतकरी निवृत्ती गायकर यांच्या ११ एकरातील द्राक्षबागेला बसल्याने बागा अक्षरश: कोलमडून पडल्या आहेत.निर्यातक्षम द्राक्ष पिकविणाºया निफाडची ख्याती सातासमुद्रापार पोहचली असताना कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यातील निर्यातक्षम व दर्जेदार द्राक्ष पिकांना याचा फटका बसला. परिणामी द्राक्ष पिकांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने द्राक्षमालाची उलाढाल पूर्णपणे थांबली आहेच त्यात तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांपुढे दुहेरी संकट ओढवले आहे. शासनाने नुकसान झालेल्या द्राक्षबागेस लवकरात लवकर भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.कोरोनामुळे द्राक्षे झाडावरचकोरोनाने जगभर थैमान घातले असताना निर्यातही पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षे ही गेल्या काही दिवसांपासून झाडावरच आहेत. कोरोनाचे सावट दूर होईल आणि चार पैसे मिळतील या अपेक्षेवर शेतकरी असतानाच अस्मानी संकटाने शेतकºयांना घेरले आणि उद्ध्वस्त केले. त्यामुळे परिसरातील शेतकरीवर्गाचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे.निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेला अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाºयामुळे माझ्या ११ एकरावरील द्राक्षबागेचे पूर्णपणे नुकसान होत बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळाली पाहिजे.- निवृत्ती गायकर,नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी