शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

गारपिटीमुळे द्राक्षबागांना रोगाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:25 IST

मान्सून मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्याने शहर व जिल्हा परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: या ढगाळ वातावरणाचा द्राक्षपिकाला रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.

नाशिक : मान्सून मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्याने शहर व जिल्हा परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: या ढगाळ वातावरणाचा द्राक्षपिकाला रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर पावसापासून कांदा वाचवण्याचे संकट उभे ठाकले असतानाच वादळी पाऊस आणि गारपिटीपासून फळभाज्या व पालेभाज्या वाचविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.  मान्सून आगमनाच्या काळात होणाºया गारपिटीमुळे पाने फाटणे, हिरव्या काडीवर जखमा होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे जिवाणू करपा किंवा मोट्रीओडिप्लोडियासारख्या बुरशा काडीमध्ये वाढण्याची शक्यता असते. द्राक्ष उत्पादक शेतकºयांसमोर अशाप्रकारे करपा नियंत्रणाचे आव्हान असताना, कांदा उत्पादक व फळभाज्या-पालेभाज्या उत्पादक शेतकरीही संकटात आहे. मान्सूनचा पाऊस तोंडावर आलेला असताना भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना कांदा साठविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, तर फळभाज्या व पालेभाज्यांना गेल्या जानेवारी महिन्यापासून समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने शेतकºयांनी संपाचे अस्त्र उपसले असून, त्यामुळे १ व २ जून रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील संपूर्ण व्यवहार कोलमडल्याचे दिसून आले. या संपाच्या झळा अद्यापही कायम असून, सध्या बाजार समितीच्या आवारात काहीसे समाधानकारक भाव मिळत असले तरी ही परिस्थिती कायमस्वरूपी टिकण्यासाठी सरकाने सकारात्मक पाऊले उचलण्याची गरज शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.संपकाळात तीन कोटींची उलाढाल ठप्पराष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ व २ जून या दोन दिवसांत जवळपास तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. त्यामुळे संपाचा अप्रत्यक्षरीत्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागला. संपामुळे शेतकरी व्यापाºयांसोबतच मालवाहतूकदारांनाही मोठा फटका बसल्याचे दिसून आले. संपाच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेत केवळ ३० टक्के माल आल्याने मुंबई तथा परराज्यात शेतमाल वाहतूक करणाºया व्यावसायिकांनाही फटका बसला, तर दुस-या दिवशी ३६४ व तिसºया दिवशी ५९२ वाहनांमधून मालाची वाहतूक झाल्याने आता बाजार समिती पूर्वपदावर येत आहे.कांदा साठविण्याच्या कामाला वेगउन्हाळ कांद्याला संपूर्ण हंगामात केवळ तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवटच्या टप्प्यात भाव काही प्रमाणात वधारले असले तरी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळेच १ जूनपासूनच्या संपकाळात शेतकºयांनी कांदा बाजारपेठेत आणणे थांबविले असून, कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी कांदा साठविण्याच्या कामाला वेग आला आहे. परंतु पुरेशी आणि तंत्रशुद्ध यंत्रणा नसल्याने घरात, गोठ्यात जशी जागा उपलब्ध होईल तसा कांदा साठविण्याची नामुष्की शेतकºयांवर आली आहे.कांद्याप्रमाणेच जानेवारीपासून टमाटेही कवडीमोल भावाने विकावा लागला. गेल्या काही दिवसांपासून टमाट्याच्या बाजारभावात काही प्रमाणात वाढ झालेली दिसत असताना, शेतकरी संपामुळे बाजार समितीत येणारा माल थांबवला गेल्याने शेतक ºयांना काही प्रमाणात त्याचा फटका बसला. परंतु बाजार समितीतील आवक व लिलावप्रक्रिया पूर्ववत झाल्याने टमाटा उत्पादकांना येत्या काळात चांगला भाव मिळण्याची शक्यता असली तरी वादळी पाऊस व गारपिटीपासून टमट्याचे संरक्षण करण्याचे आव्हान शेतकºयांसमोर आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी