गारपिटीच्या तडाख्यात द्राक्ष,

By Admin | Updated: March 15, 2015 00:10 IST2015-03-15T00:09:37+5:302015-03-15T00:10:02+5:30

गारपिटीच्या तडाख्यात द्राक्ष,

The grape, | गारपिटीच्या तडाख्यात द्राक्ष,

गारपिटीच्या तडाख्यात द्राक्ष,

नाशिक : अवकाळी पावसाचा कहर नाशिक शहर व जिल्'ात सुरूच असून, शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटे झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज कोसळून सहा जनावरेही दगावली असून, जिल्'ात सर्वच तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. शनिवारी सायंकाळी सिन्नर शहरासह निफाड व चांदवड तालुक्यांत गारपीट झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी मध्यरात्री जिल्'ात सिन्नर तालुक्यातील वडांगळी, देवपूर, शहा, गुळवंच, सोमठाण येथे गारपीट झाली, तर चांदवड तालुक्यात वडनेरभैरव, बहादुरी, शिवरे, बोराळे, जांभुटके या भागांत तर दिंडोरी तालुक्यात मावडी, तीसगाव, तळेगाव या भागांत प्रचंड गारपिटी व अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळपर्यंत अवकाळी पावसाची तालुकानिहाय मिलीमीटरमध्ये आकडेवारी अशी- नाशिक-९.७८, दिंडोरी-५.३३, पेठ-३.२३, निफाड-५.१९, येवला-३.३५, बागलाण-३.१४, कळवण-६.६८, मालेगाव-४, सिन्नर - १०.७३, नांदगाव - २.४३, देवळा - २.६३, चांदवड - ६, इगतपुरी - ४, त्र्यंबकेश्वर - ५.४५ अशी आकडेवारी नोेंदविण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी सिन्नर शहरात जोरदार गारपीट झाली. तसेच चांदवड तालुक्याबरोबरच निफाड तालुक्यातील काथरगाव व सुंदरपूर येथे गारपीट सुरू होती. त्यामुळे शेतीचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शनिवारी नाशिक शहरातही सकाळी पावसाळी वातावरण होते. दुपारनंतर स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. शहरालगतच्या मखमलाबाद, आडगाव, नांदूर, दसक-पंचक, मखमलाबाद, मातोरी भागांतही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

Web Title: The grape,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.