शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

कांदाचाळीला अनुदान, मात्र नुकसानभरपाईची नाही तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 01:38 IST

उन्हाळ कांद्याचे आयुर्मान सहा ते आठ महिन्यांपर्यंत असल्यामुळे त्याचे उत्पादनही बंपर होत असल्याने शेतकऱ्यांनी खळ्यातच चाळ बांधून कांद्याची साठवणूक करण्यासाठी शासन एकीकडे शेतकऱ्यांना अनुदान देत असले तरी, त्याच कांद्याचे नैसर्गिक आपत्तीत चाळीतच नुकसान झाल्यास त्याला मात्र नुकसानभरपाईपासून दूर ठेवण्यात आले आहे.

नाशिक : उन्हाळ कांद्याचे आयुर्मान सहा ते आठ महिन्यांपर्यंत असल्यामुळे त्याचे उत्पादनही बंपर होत असल्याने शेतकऱ्यांनी खळ्यातच चाळ बांधून कांद्याची साठवणूक करण्यासाठी शासन एकीकडे शेतकऱ्यांना अनुदान देत असले तरी, त्याच कांद्याचे नैसर्गिक आपत्तीत चाळीतच नुकसान झाल्यास त्याला मात्र नुकसानभरपाईपासून दूर ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्णात अवकाळी पावसाने काही तालुक्यांना झोडपून काढत शेतकºयांचे नुकसान केलेले असताना निवडणूक आचारसंहितेमुळे या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत शासनाकडून मात्र कोणतेही आदेश देण्यात आले नाही, त्या अनुषंगाने चाळीतील कांद्याच्या झालेल्या नुकसानीची मात्र भरपाई करण्याची तरतूद नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, रविवारी अंगावर वीज पडून मरण पावलेल्या चौघाही मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.रविवारी वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी घरांचे तसेच गोठ्यांचे पत्र्यांचेशेड उडून गेले असून, सोसाट्याच्या वाºयाने शेतातील उभे पीक आडवे झाले. काही ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. पाऊस फारसा पडला नसला तरी, वीज व वादळी वाºयाने नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत शासनाकडून कोणतेही आदेश प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. याच पावसामुळे शेतकºयांच्या उन्हाळ कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा काढून खळ्यावर उघड्यावर असताना पावसामुळे तो भिजला आहे. परंतु शासनाने त्याची जबाबदारी घेतलेली नाही. तोच प्रकार चाळीतील कांद्याबाबत असून, शासन शेतकºयांना कांदा चाळ बांधण्यासाठी प्रोत्साहित करून त्यासाठी अनुदान देत आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याबाबत काही अटी, शर्ती लावल्या असून, त्यात काही गोष्टींचे नुकसान झाल्यास कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.चाळीतील कांद्याची जबाबदारी शेतकºयाचीचाळीत ठेवलेल्या कांद्याचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास आपत्ती व्यवस्थापनांतर्गत त्यासाठी मदतीची तरतूद शासनाने ठेवलेली नाही. शासनाच्या मते चाळीतील कांद्याच्या संरक्षणाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शेतकºयाची असून, त्यामुळे नुकसानीची जबाबदारीदेखील त्यानेच पेलावी, असे शासनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा