पात्र असलेल्या शाळांना आठ दिवसांत अनुदान
By Admin | Updated: December 3, 2015 23:51 IST2015-12-03T23:50:44+5:302015-12-03T23:51:19+5:30
शिक्षकांचा मोर्चा : १३४३ शाळांना मिळणार लाभ

पात्र असलेल्या शाळांना आठ दिवसांत अनुदान
नाशिक : महाराष्ट्र राज्य बचाव कृती समितीच्या वतीने अनुदान पात्र शाळांना त्वरित अनुदान मिळावे, या मागणीसाठी सुमारे ५ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला होता.
या मोर्चानंतर राज्य शिक्षण आयुक्त भापकर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिक्षण आयुक्तांनी पात्र असलेल्या १३४३ शाळांना आठ दिवसांत अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन दिले. नाशिक जिल्ह्याच्या वतीने या मोर्चाचे नेतृत्व व्ही. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, मुख्याध्यापक महामंडळाचे विद्या सचिव एस. बी. देशमुख यांनी केले. ११ मागण्यांपैकी एकच मागणी १३४३ घोषित मूल्यांकन पत्र शाळांना त्वरित अनुदान देऊ मात्र अघोषित ३६० शाळाचे प्रस्ताव शासनाकडे
पाठवू.
तसेच २८ आॅगस्ट २००५ चा संच मान्यतेचा शासन निर्णय हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो शासनाला कळवू व शिक्षकेतर कर्मचारी समितीचा अहवाल मान्य करण्यासंदर्भात व कला, क्रीडा शिक्षकांची पूर्ण वेळ नियुक्ती करणे दि. ७ आॅक्टोबर २०१४ चा शासन निर्णय रद्द करणे, १ नोव्हेंबर २०१५ पूर्वी सेवेत असलेले व त्यानंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेशन योजना लागू करणे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा
बाह्य कामे न देणे या मागण्या शासनाकडे पाठवू, असे शिक्षण आयुक्त भापकर यांनी आश्वासन दिले. (प्रतिनिधी)