आजी-माजी नगरसेवक अस्तित्वासाठी आमनेसामने
By Admin | Updated: February 18, 2017 00:01 IST2017-02-18T00:01:25+5:302017-02-18T00:01:37+5:30
आजी-माजी नगरसेवक अस्तित्वासाठी आमनेसामने

आजी-माजी नगरसेवक अस्तित्वासाठी आमनेसामने
नाशिकरोड : चार गावठाण, मळे भाग, झोपडपट्टी परिसर, सोसायटी, असा भौगोलिकदृष्ट्या बनविलेल्या प्रभाग २२ मध्ये विजयाचे गणित सर्वच पक्षांना कठीण जाणार आहे. प्रभाव क्षेत्र आणि वैयक्तिक संबंध यावरच उमेदवार तरणार आहे.
‘अ’ अनुसूचित गटातून शिवसेनेच्या माजी महापौर नयना घोलप, भाजपाकडून सरोज अहिरे, मनसे तानाजी सकट, कॉँग्रेस आघाडी सारीका कीर, अपक्ष जगदीश पवार, शिवसेना उपनेते बबन घोलप यांची नात्याने सून अपक्ष सुषमा रविकिरण घोलप, बहुजन विकास आघाडी अमोल घोडे, अपक्ष नितीन जगताप, प्रवीण लासुरे, किरण राक्षे हे निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार घोलप व बाबूलाल अहिरे यांच्या मुली आमनेसामने आहेत. ‘ब’ इतर मागासवर्ग महिला गटातून शिवसेना महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सत्यभामा गाडेकर, मनसे- पुष्पा विश्वनाथ रोकडे, भाजपा- दीपाली धनाजी कोठुळे, कॉँग्रेस आघाडी माजी नगरसेवक लंकाबाई हगवणे, अपक्ष- लता जाधव या निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर रोकडे यांनी शिवसेनेतून मनसेची वाट पकडली तर हगवणे यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र सर्व पक्षीय उमेदवार, पक्षाची ताकद, वैयक्तिक नातेसंबंधावर विजयाला गवसणी घालण्याची पराकाष्ठा करत आहे. क सर्वसाधारण महिला गटातून शिवसेना नगरसेवक सुनीता उत्तम कोठुळे, भाजपा गौरी शंकर साडे, राष्ट्रवादी आघाडी - स्नेहल चैतन्य देशमुख, अपक्ष प्रणाली विक्रम कोठुळे, नाजेरा अब्दुल सत्तार शेख या निवडणूक रिंगणात आहेत. नगरसेवक म्हणून केलेली कामे ही सुनीता कोठुळेंची जमेची बाजू आहे. मात्र विहितगावातुनच प्रणाली कोठुळ ेदेखील आहे, तर देवळालीगावातून राष्ट्रवादीच्या स्नेहल देशमुख व भाजपाच्या गौरी साडे आहेत. मनसेच्या कविता जाधव या पिंपळगावखांबच्या आहेत. प्रत्येकांची मदार आपापल्या परिसरावरच अवलंबून आहे.