भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणाऱ्या ग्रामस्थाच्या जिवाला धोका दहीवडचा प्रकार : ग्रामसेवकासह सरपंच, शाखा अभियंता दोषी
By Admin | Updated: November 15, 2014 00:23 IST2014-11-15T00:22:38+5:302014-11-15T00:23:49+5:30
भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणाऱ्या ग्रामस्थाच्या जिवाला धोका दहीवडचा प्रकार : ग्रामसेवकासह सरपंच, शाखा अभियंता दोषी

भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणाऱ्या ग्रामस्थाच्या जिवाला धोका दहीवडचा प्रकार : ग्रामसेवकासह सरपंच, शाखा अभियंता दोषी
नाशिक : देवळा तालुक्यातील दहीवड या गावात इंदिरा आवास योजनेसह शासनाच्या अन्य योजनांमध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आंदोलने करणाऱ्या एका ग्रामस्थाला जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली असून, देवळा पोलिसांची भूमिकाही संदिग्ध अशी राहिल्याने या ग्रामस्थाला गाव सोडून पळापळ करावी लागत आहे. दहीवड येथील ग्रामस्थ संजय महादू देवरे यांना माजी सरपंच मनीष ब्राह्मणकर यांच्यासह विलास देवरे, योगेश काशीनाथ देवरे, पुंजाराम देवरे, योगेश श्यामराव देवरे आदिंनी वारंवार जिवे मारण्याची धमकी देऊन जगणे मुश्कील केल्याचे संजय देवरे यांच्या तक्रारीत म्हटले आहे. संजय देवरे यांनीच गावातील अनेक योजनांमधील भ्रष्टाचार व अपहाराची प्रकरणे काढल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच ग्रामसेवक डी. एन. बच्छाव, माजी सरपंच मनीष ब्राह्मणकर, तत्कालीन शाखा अभियंता जी. जी. पाटील यांच्यासह अनेकांना वसुलीच्या नोटिसा गटविकास अधिकाऱ्यांनी बजावल्या आहेत. संजय देवरे यांनी जिवाला धोका असल्याची तक्रार देवळा तालुका ठाण्यासह ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, संजय देवरे यांनी संबंधितांविरोधात २१ आॅगस्ट २०१४ रोजीच देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पोलिसांची भूमिका बघ्याची असल्याचे कळते. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)