ग़्रामस्थांनी दिला शाळेला संगणक संच भेट
By Admin | Updated: November 21, 2014 22:50 IST2014-11-21T22:50:08+5:302014-11-21T22:50:47+5:30
शुभवर्तमान : गारमाळ येथील शेतमजुरांचे योगदान

ग़्रामस्थांनी दिला शाळेला संगणक संच भेट
पेठ : आपल्या आई-बापांनी परिस्थितीमुळे शिकवले नाही़ शिक्षणात कोणत्याही प्रकारचे दारिद्र्य आड येऊ नये, आपल्याही मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे या भावनेने पेठ तालुक्यातील गारमाळ येथील मजुरी करणाऱ्या आदिवासी शेतमजुरांनी रोजच्या मजुरीतून काही पैसे वाचवून येथील प्राथमिक शाळेला संगणक संच खरेदी करून दिला़
गारमाळ हे पेठपासून दहा किमी अंतरावरील आदिवासी बहुल गाव संगणक म्हणजे काय असतो याची कोणतीही कल्पना नसतानाही आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्या मुलांनी टिकावे त्यांनाही संगणक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सतीश महाले यांनी ग्रामस्थांकडे विषय काढला़ घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही या गावातील नागरिकांनी रोजच्या मजुरीतून काटकसर करून पैसे साचवले आणि याळेला संपूर्ण संगणक संच खरेदी करून दिला़
या संगणक संचाचे केंद्रप्रमुख जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरामन कहांडोळे, पोलीस पाटील चिंतामन दळवी, मुख्याध्यापक सतीश महाले, उपशिक्षक सोनवणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ गटशिक्षणाधिकारी एस़ जी़ निर्मळ, विस्तार अधिकारी आऱ आऱ बोडके, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आऱ डी़ शिंदे आदिंनी शिक्षक व ग्रामस्थांचे कौतुक केले़(वार्ताहर)