ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित

By Admin | Updated: May 24, 2014 00:18 IST2014-05-23T22:45:33+5:302014-05-24T00:18:37+5:30

नाशिक : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन पंचायत समितीने दिल्याने राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात येणारे बेमुदत उपोषण आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.

Grampanchayat employees' agitation suspended | ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित

नाशिक : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन पंचायत समितीने दिल्याने राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात येणारे बेमुदत उपोषण आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.
या कर्मचार्‍यांना राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे सुधारित वेतन देय होते. त्यासाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते. यासंदर्भात पंचायत समिती सभापती विलास अहेर आणि गटविकास अधिकारी टी. टी. सोनवणे यांनी संघटना पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. ऑगस्ट २०१३ पासूनचे थकीत किमान वेतन थकबाकीसह एक महिन्याच्या आत सर्व ग्रामपंचायती अदा करतील, ११०० रुपयांचा विशेष भत्ता प्रतिमहिना थकबाकीसह त्वरित देण्यासाठी संंबंधिताना सूचना देण्यात आल्या. कर्मचार्‍यांचे सेवा पुस्तक लवकरच भरून देण्यात येतील,भविष्य निर्वाहनिधीचे खाते उघडले जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे संघटनेचे तालुका सचिव कृष्णा बावने यांनी सांगितले. यावेळी विस्तार अधिकारी एस. एस. महाले, एस. डी. महाले, ग्रामसेवक युनियनचे ए. एस. मवाळ, बी. बी. सरोदे, एच. पी. दराडे, डी. आर. निकाम तसेच ज्ञानेश्वर राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Grampanchayat employees' agitation suspended