मनमाड येथे भीमसैनिकांचा मोर्चा

By Admin | Updated: January 25, 2016 22:51 IST2016-01-25T22:51:52+5:302016-01-25T22:51:52+5:30

मनमाड येथे भीमसैनिकांचा मोर्चा

Grammansik's Front at Manmad | मनमाड येथे भीमसैनिकांचा मोर्चा

मनमाड येथे भीमसैनिकांचा मोर्चा

मनमाड : हैदराबाद येथील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्त्येस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मनमाड येथे भीम-सैनिकांनी मोर्चा काढून आंदोलन केले.
मनमाड महाविद्यालयापासून निघालेला मोर्चा चांदवड महामार्ग, पाकिजा चौक, एकात्मता चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आल्यानंतर समारोप करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सदर घटनेचा निषेध म्हणून केंद्रीय मंत्री व संबंधितांच्या छायाचित्रांचे दहन करण्यात आले. यावेळी राजाभाऊ पगारे, राजाभाऊ अहिरे, प्रवीण पगारे, सचिन शिरूर, गुरू निकाळे आदिंसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
नवविवाहितेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा
नाशिक : हिरावाडीत राहणाऱ्या नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू व सासरे अशा तिघांविरुद्ध पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित विवाहिता हिने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Grammansik's Front at Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.