‘ग्रामसभा आपल्या दारी’

By Admin | Updated: October 13, 2015 22:52 IST2015-10-13T22:48:49+5:302015-10-13T22:52:12+5:30

उपक्रमलासलगाव : महिलांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न

'Gram Sabha your door' | ‘ग्रामसभा आपल्या दारी’

‘ग्रामसभा आपल्या दारी’

लासलगाव : ग्रामसभा घेण्यासाठी शासनाने ठरविलेल्या दिवशी वेळेअभावी वा कामाअभावी प्रत्येकजण उपस्थित राहू शकत नाही. रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाव्या लागणाऱ्या महिलांची उपस्थिती त्यात नगण्य असते. त्यामुळे नवनिर्वाचित उपसरपंच जयदत्त होळकर यांच्या संकल्पनेतून नागरिक आपल्याकडे येण्याऐवजी आपणच त्यांच्याकडे जाऊन अडचणी समजून घेऊ या उद्देशाने ग्रामपंचायतीने ‘ग्रामसभा आपल्या दारी’ हा उपक्रम गत आठवडाभर राबविला.
यात सहा वॉर्डांतून कृषीनगर, श्रीरामनगर, सप्तशृंगीनगर, सुमतीनगर, गणेश मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, श्रीराम मंदिर, अहल्यादेवी चौक या ठिकाणी आठ ग्रामसभा सरपंच संगीता शेजवळ, उपसरपंच जयदत्त होळकर, ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच कुसुमताई होळकर, स्नेहल ब्रह्मेचा, श्वेता मालपाणी, रोहिणी मोरे, गुलशन मन्सुरी, राणी शहा, सचिन होळकर, प्रतिभा पानगव्हाणे, योगीता झांबरे, योगेश पाटील, संतोष पलोड ग्रामविकास अधिकारी सी. के. मुंडे यांच्यासह सुवर्णा जगताप, संतोष ब्रह्मेचा, प्रकाश पाटील, राजेंद्र चाफेकर, गोकुळ पाटील, विजय जोशी, ग्रामविकास अधिकारी सी. के. मुंढे, डॉ. विकास चांदर, डॉ. श्रीनिवास दायमा, रवि होळकर, बाळासाहेब बोरसे, चंद्रभान मोरे व त्या-त्या वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी मांडलेल्या सूचना व समस्यांचे लेखी प्रोसेडिंगही यावेळी करण्यात आले. सहाही ग्रामसभेतून प्रत्येक वॉर्डात रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी वेळेवर सोडणे या समस्या प्रामुख्याने उपस्थितांनी मांडल्या. तसेच एकवेळ रस्त्याची कामे उशिरा करा मात्र गावात भुयारी गटारीच्या कामास प्राधान्य द्यावे, कारण सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे, असे मत जाणकार नागरिकांनी मांडले. ग्रामसभेतून समोर आलेल्या सूचना व समस्यांची विगतवारी केली जाईल. ज्या समस्या ग्रामपंचायत पातळीवरील आहेत त्या तातडीने सोडविल्या जातील. नागरिकांच्या मुख्य समस्यांमध्ये रस्ते, सांडपाणी व पावसाचे पाणी यासाठी भुयारी गटार आदिंवर पुढील पाच वर्षांसाठी अंदाजे किती खर्च होणार आहे याचा आराखडा तयार केला जाईल. गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी संभावित कामांसाठी शासनाच्या योजना मिळविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मंडळ प्रयत्न करेल व जसजसा निधी उपलब्ध होईल तसतशी प्राधान्यक्रमानुसार कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही उपसरपंच होळकर यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: 'Gram Sabha your door'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.