जोरण येथे ग्रामसभा

By Admin | Updated: August 12, 2016 22:47 IST2016-08-12T22:47:04+5:302016-08-12T22:47:17+5:30

जोरण येथे ग्रामसभा

Gram Sabha at Jiyan | जोरण येथे ग्रामसभा

जोरण येथे ग्रामसभा

जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे मंगळवारी जोरण ग्रामपंचायत कार्यालयात ‘आमचं गाव, आमचा विकास’अंतर्गत चौदावा वित्त आयोग कृती आराखडा तयार करणे या अनुषंगाने ग्रामसभा घेण्यात आली होती.
यावेळी प्रभारी अधिकारी व्ही.सी. नेरकर यांनी चौदावा वित्त आयोग कृती आराखड्यासंदर्भात माहिती दिली तसेच जो निधी आपल्या ग्रामपंचायतीला आला तर त्या निधीचा उपयोग आपण सर्व एकत्र येऊन या निधीला आपण योग्य त्या ठिकाणी आपण ग्रामपंचायतमार्फत ते कामे करू शकतो. त्या निधीचा वापर आपण ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना आपल्याला करता येईल, कोरडवाहू शेतकरी त्याला विहीर मंजुरी देता येणार, रस्त्यांची कामे अशा विविध कामांची माहितीही दिली व तसेच सर्व एकत्र येऊ व विकासकामे मार्गी लावू, असे प्रभारी अधिकारी व्ही.सी. नेरकर यांनी माहिती दिली.
तसेच उपसरपंच सुभाष सावकार यांनी आपल्या गावातील प्रमुख ज्या समस्या आहेत त्या त्यांनी ग्रामसभेत वाचून दाखवल्या. आपल्याला जो निधी येणार तो निधी आपण पाणीपुरवठा विहीर, भूमिगत बंधारे, वैकुंठधाम बांधणे, भुयारी गटारी बांधणे अशा अनेक कारणे सांगितले व उपसरपंच यांनी ग्रामस्थांना सागितले.
यावेळी व्ही.सी. नेरकर, प्रवीण प्रशिक्षक केतन रौंदळ, पंकज पवार, आक्काबाई माळी, सुभाष सावकार, देवरे, भालचंद्र बिरारी, आरोग्यसेवक प्रमोद देशमुख, डिगंबर देवरे, रवींद्र बेडीस, शांताराम खैरनार, दिनेश सावकार, भिला सावकार, महादू सावकार, बाळासाहेब पाटील, कडू सावकार, मुरलीधर सावकार, कैलास सावकार, शरद सावकार आदि ग्रामस्थ व कर्मचारी हजर होते. (वार्ताहर)

Web Title: Gram Sabha at Jiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.