ग्रामपंचायतीकडून दारूबंदीचा ठराव
By Admin | Updated: May 9, 2017 01:34 IST2017-05-09T01:34:05+5:302017-05-09T01:34:14+5:30
तळवाडे दिगर : अवैध दारूविक्री व्यवसायाचा नायनाट करण्यासाठी ग्रामपंचायतीने कंबर कसली असून, ग्रामसभा बोलावून दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीकडून दारूबंदीचा ठराव
लोकमत न्यूज नेटवर्क
तळवाडे दिगर : अवैध दारूविक्री व्यवसायाचा समूळ नायनाट करण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने कंबर कसली असून, ग्रामसभा बोलावून दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत दि. ८ मे रोजीच्या ‘लोकमत’मध्ये ‘तळीरामांनी वळविला खेड्यांकडे मोर्चा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची ग्रामपंचायतीने गांभीर्याने दखल घेतली आहे. काही वर्षांपासून थंड पेयच्या नावाखाली ‘सर्व’च पेय काही टपऱ्यांवर विकले जात आहेत. संबंधित खातेप्रमुखांनी गावाची शांतता अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांचा समूळ नायनाट करावा, अशी विनंती या ठारावाद्वारे ग्रामपंचायतीने केली आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही दिला आहे. ठरावाचे सूचक राजेंद्र भिवाजी जगताप हे असून, डॉ. मुरलीधर पवार यांनी अनुमोदन दिले आहे.