ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीकडे उमेदवारांची पाठ अखेरच्या दिवशी झुंबड : छापील नामांकन स्वीकारण्याची मुभा

By Admin | Updated: November 9, 2014 00:13 IST2014-11-09T00:12:27+5:302014-11-09T00:13:09+5:30

ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीकडे उमेदवारांची पाठ अखेरच्या दिवशी झुंबड : छापील नामांकन स्वीकारण्याची मुभा

Gram panchayat's by-elections to candidates by the end of the day: the nomination of the printed nomination | ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीकडे उमेदवारांची पाठ अखेरच्या दिवशी झुंबड : छापील नामांकन स्वीकारण्याची मुभा

ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीकडे उमेदवारांची पाठ अखेरच्या दिवशी झुंबड : छापील नामांकन स्वीकारण्याची मुभा

  नाशिक : जिल्'ात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राज्य आयोगाच्या आॅनलाइन नामांकनाकडे दुर्लक्ष करून निवडणूक अधिकाऱ्यांनी छापील अर्ज दाखल करून ही प्रक्रिया पार पाडली. विशेष म्हणजे या निवडणुकीतही बहुतांशी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीकडे इच्छुकांनी पाठ फिरविली, तर काही ठिकाणी सार्वत्रिक जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्'ातील ७२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, तर ८८ रिक्त जागांवर पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी अर्ज दाखल करण्याची शनिवारी अंतिम मुदत होती. गेल्या तीन दिवसांपासून राज्य आयोगाने उमेदवारांचे अर्ज आॅनलाइन स्वीकारण्याचे आदेश दिल्यामुळे मोठा गोंधळ उडून यंत्रणा पेचात सापडली होती. परिणामी या पद्धतीत येणारे तांत्रिक व कायदेशीर त्रुटी दूर करण्याबाबत आयोगाला अवगत करण्यात आल्यानंतर शनिवारी सकाळी आयोगाने दुपारी तीन वाजेपर्यंत छापील स्वरूपाचे अर्ज स्वीकारण्यास हरकत नसल्याचा हिरवा कंदील दर्शविल्याने मार्ग मोकळा झाला. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने तहसील कार्यालयात इच्छुकांनी समर्थकांसह मोठी गर्दी केली होती. काही जागांवर तडजोडीचे, तर काही ठिकाणी मनधरणीचेही प्रकार करण्यात आले. अखेर तीन वाजेला काही कालावधी बाकी असताना अर्ज दाखल करताना अक्षरश: रांगा लागल्याचे प्रकारही पाहण्यास मिळाले.

Web Title: Gram panchayat's by-elections to candidates by the end of the day: the nomination of the printed nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.