ग्रामपंचायत कार्यालय, मानोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST2021-06-09T04:16:43+5:302021-06-09T04:16:43+5:30

(०८ मानोरी) ---------------------------- ग्रामपंचायत कार्यालय, डोंगरगाव मेशी : डोंगरगाव येथील ग्रामपंचायतीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन ...

Gram Panchayat Office, Manori | ग्रामपंचायत कार्यालय, मानोरी

ग्रामपंचायत कार्यालय, मानोरी

(०८ मानोरी)

----------------------------

ग्रामपंचायत कार्यालय, डोंगरगाव

मेशी : डोंगरगाव येथील ग्रामपंचायतीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयाजवळ भगवा ध्वज लावून गुढी उभारण्यात आली. यावेळी सरपंच दयाराम सावंत, पोलीस पाटील प्रल्हाद केदारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच लालजी सावंत, विनोद सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश सावंत, ग्रामसेवक सतीश मोरे, खंडू सावंत, किसन गोसावी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

------------------------------

झाडांचे राेपण करून कार्यक्रम

दिंडोरी : स्वराज्य संवर्धन बहुद्देशीय संस्थेच्या शिवराज्याभिषेकदिनी अनोखा उपक्रम राबवून महाराजांना मानवंदना देण्यात आली. किल्ले अहिवंतवरती १०१ भारतीय वंशाच्या जंगली झाडांचे रोपण करून त्यांचे जतन करण्याचा संकल्प करण्यात आला. त्याचबरोबर नेहमीच स्वराज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणारी ही संस्था ह्या वर्षी १००१ वृक्षांचे रोपण करून त्यांना वेळोवेळी खतपाणी देऊन संवर्धन करण्याचा संकल्प करून सुरुवात करत आहे. यावेळी भाऊसाहेब कुमावत, प्रवीण सोमवंशी, प्रवीण भेरे, प्रवीण घोलप, समाधान जाधव, दिलीप सोनवणे, मयुर घुले, कुनाल पेखळे, शाम हिरे, सागर साळवे, आशिष घोलप, बाळनाथ जाधव, पंकज ठाकरे उपस्थित होते.

--------------------------

Web Title: Gram Panchayat Office, Manori