ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर / निफाडच्या ग्रामसभेत देण्यात आली मंजुरी

By Admin | Updated: May 24, 2014 00:19 IST2014-05-23T19:10:26+5:302014-05-24T00:19:21+5:30

निफाड : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तालुका ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या निर्णयास निफाड ग्रा. पं.च्या ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली.

Gram Panchayat Nagar Panchayat conversion / Gram Sabha in Niphad approved | ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर / निफाडच्या ग्रामसभेत देण्यात आली मंजुरी

ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर / निफाडच्या ग्रामसभेत देण्यात आली मंजुरी

निफाड : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तालुका ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या निर्णयास निफाड ग्रा. पं.च्या ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली.
निफाड ग्रा.पं.ची ग्रामसभा निफाडच्या शनिचौकात संपन्न झाली. त्याप्रसंगी एकमताने या निर्णयास मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी सरपंच अनिल कुंदे, उपसरपंच दिलीप कापसे यांच्यासह ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी निफाडमध्ये शिखराच्या जड वाहनांच्या प्रश्नावर चांगलीच चर्चा झाली. जड वाहने शहरात प्रवेश करीत असल्याचे शहरातील रस्ते खराब होत आहे. त्यामुळे या जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करावी. शिंपी गल्लीतील जुन्या जलकुंभाच्या जागेवर नवीन जलकुंभ बांधावा, हाय पॉवर बल्ब माणकेश्वर चौकात बसवावे आदिंसह इतर मागण्या मधुकर शेलार, रवींद्र कुंदे, सुरेश नवले, प्रभाकर सोनवणे आदिंनी केली.
याप्रसंगी बोलताना सरपंच अनिल कुंदे म्हणाले की, नगरपंचायत होण्यामुळे शहराला मिळणार्‍या विकास निधीत वाढ होणार असल्याने शहराच्या विकासात भर पडणार असल्याने निफाड ग्रा.पं. संचालक मंडळाने शासनाकडे नगरपंचायतीची शिफारस केली. निफाड नगरपंचायत व्हावी, अशी सूचना बाळासाहेब कुंभार्डे यांनी केली, तर बाळासाहेब पेंढारकर यांनी अनुमोदन दिले.
ग्रामविकास अधिकारी गारे यांनी होणार्‍या निफाड नगर पंचायतसंदर्भात माहिती देताना सांगितले की, निफाड नगरपंचायतसाठी २०४३.६८ इतके असून, यात ११०८ गटांचा समावेश आहे. निफाड जि.प. गट व पं.स. गणातून ही क्षेत्रे वगळली जाणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Gram Panchayat Nagar Panchayat conversion / Gram Sabha in Niphad approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.