ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा
By Admin | Updated: April 24, 2015 01:44 IST2015-04-24T01:44:04+5:302015-04-24T01:44:26+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा
नाशिक : जिल्'ातील ४९७ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत अनेक प्रस्थापितांना हादरा बसला असून, मोठ्या प्रमाणावर सत्तांतर झाल्याने आता सरपंच पदासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिक तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात करण्यात येऊन त्यासाठी २३ टेबल लावण्यात आले होते. दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजेपासूनच तालुक्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणीसाठी गर्दी केली होती. जस जसे निकाल जाहीर होत होते, त्या त्या प्रमाणात समर्थकांकडून जल्लोष केला जात होता. जिल्'ातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तांतर घडले आहे.