धान्य गुदामात कॅमेरे कार्यान्वित

By Admin | Updated: March 29, 2015 00:30 IST2015-03-29T00:26:57+5:302015-03-29T00:30:30+5:30

पहिला प्रयोग : काळाबाजार रोखण्यासाठी यंत्रणेचा उपक्रम

The grains operated in the pit-pit cameras | धान्य गुदामात कॅमेरे कार्यान्वित

धान्य गुदामात कॅमेरे कार्यान्वित

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालीत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याबरोबरच धान्याचा काळाबाजार व गैरव्यवहार रोखण्यासाठी धान्य गुदामांवरच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, नाशिक तहसीलदारांनी शहरातील धान्य गुदामावर तीन कॅमेरे बसवून त्याआधारे नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आहे.
सुरगाणा व सिन्नर येथे मोठ्या प्रमाणावर धान्याचा काळाबाजार झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंंह कुशवाह यांनी गेल्या आठवड्यातच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले होते. सुरगाणा व सिन्नर येथील धान्य घोटाळ्यात वाहतूकदार, रेशन दुकानदार व धान्य गुदामपालांचे संगनमत उघडकीस आले होते. शासकीय यंत्रणेच्या सहभागाशिवाय धान्याचा अपहार वा काळाबाजार होऊ शकत नसल्याचे या दोन्ही घटनांवरून स्पष्ट झाल्याने ते रोखण्यासाठी धान्य गुदामांवरच नियंत्रण आणण्याचा विचार पुढे आला व त्याआधारेच सर्व धान्य गुदामांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकरवी सर्व तहसीलदारांकडून माहिती मागविली जात असतानाच नाशिक तहसीलदार गणेश राठोड यांनी शासकीय विश्रामगृहाजवळील शासकीय धान्य गुदामात तीन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. गुदामाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक कॅमेरा व आत दोन असे तीन कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावरील कॅमेऱ्यातून धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंद होईल, तर गुदामातील कॅमेरे आतील धान्यावर लक्ष ठेवण्यास उपयोगी पडणार आहेत. जिल्ह्यात नाशिकमध्येच पहिला प्रयोग करण्यात आल्याने त्याच्या आधारे गुदामांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The grains operated in the pit-pit cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.