बायोमेट्रिक ई-पॉज प्रणालीद्वारे धान्य वाटप

By Admin | Updated: July 16, 2017 00:51 IST2017-07-16T00:50:59+5:302017-07-16T00:51:19+5:30

येवला : बायोमेट्रिक ई-पॉज मशीनद्वारे अंगठा घेऊन धान्य वितरणाचा प्रारंभ एरंडगाव बुद्रुक येथे प्रांताधिकारी भीमराज दराडे, तर अंगणगाव येथे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या हस्ते करण्यात आला

Grain Allocation Through Biometric E-Pause System | बायोमेट्रिक ई-पॉज प्रणालीद्वारे धान्य वाटप

बायोमेट्रिक ई-पॉज प्रणालीद्वारे धान्य वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : बायोमेट्रिक ई-पॉज मशीनद्वारे कुटुंब प्रमुखाचा अंगठा घेऊन धान्य वितरणाचा प्रारंभ तालुक्यातील एरंडगाव बुद्रुक येथे येवल्याचे प्रांताधिकारी भीमराज दराडे, तर अंगणगाव येथे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सरपंच अनिल साताळकर, पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे, पुरवठा अव्वल कारकून योगेश पाटील, स्वस्त धान्य दुकानदार सतीश काळे, वाल्मीक घोरपडे, वाल्मीक पडोळ यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.  तालुक्यातील एकूण १४० स्वस्त धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक ई-पॉज मशीन बसविण्यात आले आहे. त्यानुसार एरंडगाव बुद्रुक व अंगणगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थींचे प्रांताधिकारी भीमराज दराडे व तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या उपस्थितीत लाभार्थींचे थम्ब घेण्यात आले व धान्याचे वितरण सुरू करून प्रत्यक्षात रेशनिंग बायोमेट्रिक ई-पॉज यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.  यावेळी तहसीलदार बहिरम यांनी ई-पॉज मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचे फायदे व माहिती उपस्थित लाभार्थींना समजावून सांगितली. या मशीनमुळे धान्य वाटपात होणारा फेरफार थांबणार असून, एक क्लिकवर दुकानदारांचा सर्व हिशेब समजणार आहे. प्रत्येक दुकानदाराला हे मशीन वापरणे बंधनकरक करण्यात आले आहे.


 

Web Title: Grain Allocation Through Biometric E-Pause System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.